महाराष्ट्र 18 पगड जातीचं राज्य आहे. या राज्यात 492 जाती राहतात. ओबीसीनी आमचं खूप खाल्लं असं म्हणतात, मात्र ओबीसी समाजाला आरक्षण देण्यासाठी 1994 साल उजाडलं. आता ओबीसीतून आरक्षण मिळवण्यासाठी नवीन जावईशोध लावला जात आहे. कुणबी प्रमाणत्र मिळवून ओबीसीतून आरक्षण मिळण्याचा डाव आहे. मात्र हे निजामाकडे जहागीरदार होते, मग हे कसले कुणबी, असा टोला ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी जरांगे यांना लगावला आहे.
मराठा-ओबीसी असा वाद पेटवून मंत्री छगन भुजबळ यांना अडवलं, त्यांना बदनाम करण्यात आलं. मात्र पारधी समाजाला आजही गावा बाहेर पाल टाकून राहावं लागतं. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सोबत 18 पगड जातीचे मावळे होते. जिवाजी महाले,शिवा काशीद, बहिर्जी नाईक, तानाजी मालुसरे सर्व जातीतून सरदार तयार आले होते. ओबीसींनी आमचं लई खाल्लं असं म्हणतात, मात्र राज्याच्या विकासात ओबीसींनी खूप मोठं योगदान दिलं. परंतु आम्हाला सामाजिक दुय्यम वागणूक दिली. आता तुम्हाला गरिबी आली म्हणता, मग न्हावी समाजाचं दुकान कधी लावलं का तुम्ही? असा सवाल हाकेंनी केला आहे.
60 टक्के बजेट ओबीसींना मिळायला पाहिजे, पण ते मिळत नाही. फक्त 1 टक्का बजेट मिळतं. तसंच नांदेड जिल्ह्यात आमची 3 ते 4 माणसे उपोषणाला बसली पण तुम्ही त्यांना भेट दिली नाही. आमचं काही चुकलं, आम्ही आतापर्यंत मते दिली. या राज्यात 492 जाती राहतात, आम्ही सगळे एकत्र आलो तर तुम्हाला सरपंचही होऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी सरकारलाही दिला आहे.
मनोज जरांगे यांनी महाविकास आघाडीच्या बाजूने प्रचार केला. चंद्रकांत खैरे यांच्या विरोधात प्रचार केला, बुरुडाचा माणूस पाडला. बिहारमध्ये लालू प्रसाद यादव येतात पण याच फुले शाहू आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात मात्र ओबीसींचा माणूस समोर येत नाही. तसंच शरद पवारांचं जर ओबीसींना समर्थन असत तर आता पर्यंत 4 वेळा देशाचे पंतप्रधान राहिले असते.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.