Supriya Sule News: 'पंधराशे रुपयात मत विकत घेण्याचा कार्यक्रम', 'लाडकी बहीण' योजनेवरुन सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला!

Supriya Sule Press Conference Dhule: 'लाडकी बहीण योजनेसाठी बँकामध्ये गर्दी होत आहे. बँकांमध्ये होणारा गोंधळ हे प्रशासनाच अपयश आहे. हे सरकार मिस मॅनेजमेंटचे सरकार आहे या सरकारकडून मला काही अपेक्षा नाही,' असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला आहे.
Supriya Sule News: 'पंधराशे रुपयात मत विकत घेण्याचा कार्यक्रम', लाडकी बहीण योजनेवरुन सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला!
Supriya SuleSaam Tv
Published On

भूषण अहिरे| धुळे, ता. १८ ऑगस्ट २०२४

मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेसाठी बँकेत मोठी गर्दी होत आहे आणि पोलीस बंदोबस्त वाढवण्याची मागणी होत आहे. यावरुनच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महायुती सरकारवर निशाणा साधला असून हे सरकार मिस मॅनेजमेंटचे सरकार आहे या सरकारकडून मला काही अपेक्षा नाही, असा टोला त्यांनी लगावला आहे. धुळ्यामध्ये त्या माध्यमांशी बोलत होत्या.

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

"लाडकी बहीण योजनेसाठी बँकामध्ये गर्दी होत आहे. बँकांमध्ये होणारा गोंधळ हे प्रशासनाच अपयश आहे. हे सरकार मिस मॅनेजमेंटचे सरकार आहे या सरकारकडून मला काही अपेक्षा नाही. स्वतःच्या स्वार्थासाठी एकत्र झालेले हे सरकार असल्याच म्हणत त्यांच्याकडून काय दुसऱ्याच्या वेदना आणि प्रश्न सोडवण्याची काय अपेक्षा करता?" असा सवाल सुप्रिया सुळेंनी उपस्थित केला आहे.

१५०० रुपयात मत विकत घेण्याचा कार्यक्रम

"लडकी बहीण योजनेच्या फॉर्म भरताना चुकीच्या पद्धतीने गोष्टी घडत असतील तर सरकार काय करते? ही सरकारची चूक आहे. लाडकी बहीण योजना ही सरकारची असून सरकारच्या पोर्टलच्या माध्यमातून तिचं कामकाज सुरू आहे आणि याबाबतीत जर सरकारच्या मंत्री जर असं बोलत असतील आम्ही केंद्राकडे चौकशीची मागणी करू ही योजना म्हणजे पंधराशे रुपये महिन्याला देत मत विकत घेण्याचा कार्यक्रम हा सध्याच्या महायुती सरकारने लावला आहे," असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

Supriya Sule News: 'पंधराशे रुपयात मत विकत घेण्याचा कार्यक्रम', लाडकी बहीण योजनेवरुन सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला!
Bengaluru Crime: अनैतिक संबंधांच्या संशयातून भयंकर कांड! मुलाच्या डोळ्यादेखत बायकोची हत्या; फरार पतीचा मृतदेह आढळला

दादांना राखी बांधणार का?

"यंदाच्या रक्षाबंधनाला अजित दादांना राखी बांधणार का? याबाबत विचारले असता सुप्रिया सुळे यांनी महत्वाचे विधान केले आहे. आपला एक महिन्यापूर्वीच नाशिक दौरा ठरलेला असून आधी लग्न कोंढाण्याचे असं म्हणत दिलेली जबाबदारी पार पाडणे हेच आमचे संस्कार असल्याचं मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.

Supriya Sule News: 'पंधराशे रुपयात मत विकत घेण्याचा कार्यक्रम', लाडकी बहीण योजनेवरुन सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला!
Nandurbar Accident : भयंकर! चालकाला हृदयविकाराचा झटका, अलिशान कारने तिघांना चिरडलं; दोघांचा घटनास्थळीच मृत्यू

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com