CM Eknath Shinde Speech: 'लाडकी बहिण'च्या यशाने वेडे झालेल्या विरोधकांना कंदी पेढे पाठवा', साताऱ्यात CM शिंदेंची फटकेबाजी; 'मविआ'वर टीकास्त्र!
Ladki Bahin Yojana Satara:Saamtv

CM Eknath Shinde Speech: 'लाडकी बहीण'च्या यशाने वेडे झालेल्या विरोधकांना कंदी पेढे पाठवा', साताऱ्यात CM शिंदेंची फटकेबाजी; 'मविआ'वर टीकास्त्र!

Ladki Bahin Yojana Satara: "17 ऑगस्ट हा दिवस मुख्यमंत्री लाडकी बहीण दिन म्हणून आपण साजरा करूया, या योजनेच्या यशाने वेडे झालेल्या विरोधकांना आपल्या साताऱ्याचे प्रसिद्ध कंदी पेढे खायला पाठवा, असा टोलाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला.
Published on

ओंकार कदम, सातारा|ता. १८ ऑगस्ट २०२४

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा वचनपुर्ती सोहळा आज साताऱ्यामध्ये पार पडत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांची या कार्यक्रमाला उपस्थिती आहे. यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तुम्ही टेन्शन घेऊ नका सावत्र भावांना टेन्शन द्या, असे म्हणत जोरदार फटकेबाजी केली.

काय म्हणाले एकनाथ शिंदे?

"येताना सर्व ठिकाणी महिलांचा महासागर पाहायला मिळाला. सगळ्यात जास्त भगिनी या कार्यक्रमात पाहायला मिळाला. मी या साताऱ्याच्या भूमी पुत्र आणि इथे कार्यक्रम होतोय हे माझ्यासाठी भाग्याचे आहे. आपल्या समोर नतमस्तक होतो मी भाग्यवान आहे मला आपल्या सारख्या बहिणी मिळाल्या. हा कार्यक्रम महाराष्ट्रात सुपर डूपर हीट झाला आहे. लाडक्या बहिणींसाठी पूर्ण आर्थिक वर्षात 35 हजार कोटींची तरतूद देण्यात आली आहे," असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

विरोधकांना टोला

"विरोधक दोन चार महिन्यांतून सरकार पडेल म्हणायचे पण अस झालं नाही. मी सामान्य कुटुंबातून आलेला मुख्यमंत्री आहे, सोन्याचा चमचा घेऊन आलेला नाही. आम्ही आता 1500 रुपयांनी योजना सुरू केली पुढे सरकारची ताकद वाढली की या दीड हजाराचे 3 हजार किंवा त्यापेक्षा जास्त होईल. आम्हाला फक्त 3000 घेऊन थांबायचं नाही, आम्हाला लखपती झालेली बहीण बघायची आहे," असेही मुख्यमंत्री एकनाथ शिदे म्हणाले.

CM Eknath Shinde Speech: 'लाडकी बहिण'च्या यशाने वेडे झालेल्या विरोधकांना कंदी पेढे पाठवा', साताऱ्यात CM शिंदेंची फटकेबाजी; 'मविआ'वर टीकास्त्र!
Maharashtra Politics : लाडक्या बहिणीवरुन महायुतीत धुसफूस; विधानसभेपूर्वी शिवसेना-राष्ट्रवादीत वाद पेटला

कंदी पेढे पाठवा!

"ही ओवाळणी दर महिन्याला भावांच्या कडून मिळणार आहे. तुम्ही टेन्शन घेऊ नका सावत्र भावांना टेन्शन द्या. आपल्या बहिणींच्या बद्दल उद्गार काढताना विरोधकांना थोडी लाज वाटली पाहिजे. खात्यात पैसे आल्यावर विरोधकांची थोबाड पांढरी फटक झाली. आपली बहीण लाडकी आणि विरोधकांच्या छातीत भरली धडकी. 17 ऑगस्ट हा दिवस मुख्यमंत्री लाडकी बहीण दिन म्हणून आपण साजरा करूया. या योजनेच्या यशाने वेडे झालेल्या विरोधकांना आपल्या साताऱ्याचे प्रसिद्ध कंदी पेढे खायला पाठवा, असा टोलाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला.

CM Eknath Shinde Speech: 'लाडकी बहिण'च्या यशाने वेडे झालेल्या विरोधकांना कंदी पेढे पाठवा', साताऱ्यात CM शिंदेंची फटकेबाजी; 'मविआ'वर टीकास्त्र!
Maharashtra Politics : भाजप 400 पार गेला असता तर मोदींनी 3 गोष्टी नक्कीच घडवून आणल्या असत्या; 'सामना'तून टीका

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com