Satara News : ...तर निवडणूकच लढणार नाही; भाजप आमदार जयकुमार गोरेंची कार्यक्रमातच घोषणा, नेमकं काय झालं?

MLA Jaykumar Gore News : टेंभू योजनेच्या अंतर्गत दुष्काळग्रस्त भागाला भरघोस निधी आमदार जयकुमार गोरे यांच्या पाठपराव्यामुळे मिळाला आहे. आता या भागात जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात सुरू होत आहेत.
Jaykumar Gore
Jaykumar GoreSaam TV
Published On

Satara Latest News :

माण खटावचे भाजप आमदार जयकुमार गोरे विरोधकांना थेट आव्हान दिलं आहे. जोपर्यंत जिहे-कठापूरचे पाणी हिंगणीत सुटत नाही, टेंभूच्या योजनेचे भूमिपूजन करत नाही तोपर्यंत आपण निवडणूक लढणार नाही, असा शब्द जयकुमार गोरे यांनी जाहीर कार्यक्रमात दिला आहे. बिजवडी येथे झालेल्या कार्यक्रमामध्ये ते बोलत होते.

यावेळी बोलताना ते म्हणाले की, माण-खटावमधील ४४ गावांसाठी टेंभू प्रकल्पांतर्गत अडीच टीएमसी, तर माणच्या उत्तरेकडील २१ गावांसाठी जिहे-कठापूरचे दीड टीएमसी पाणी फेरवाटपामुळे आरक्षित झाले. त्यासाठी निधीही मंजूर झाला.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Jaykumar Gore
CM Eknath Shinde: 'सरकारची भूमिका, धोरण स्पष्ट...' मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्र्यांचे महत्वाचे विधान, काय म्हणाले?

जिहे- कठापूर योजनेचे भूमिपूजन करून पाइपलाइनचे काम सुरू आहे, तर नुकतेच ४४ गावांच्या सिंचनासाठी ६८४ कोटींचा निधी मंजूर करून आणला आहे. एका महिन्यात टेंडर निघून या योजनेचे लवकरच भूमिपूजन होईल.

जोपर्यंत जिहे- कठापूरचे पाणी हिंगणीत सुटत नाही, टेंभूच्या योजनेचे भूमिपूजन करत नाही, तोपर्यंत आपण निवडणूक लढणार नाही हा माझा शब्द आहे, असं आमदार जयकुमार गोरे यांनी जाहीर कार्यक्रमात बोलून दाखवलं.

Jaykumar Gore
Covid New Variant JN.1 : कोरोना व्हायरसच्या नव्या व्हेरिएंटने टेन्शन वाढवलं, केरळमध्ये दोघांचा मृत्यू

टेंभू योजनेच्या अंतर्गत दुष्काळग्रस्त भागाला भरघोस निधी आमदार जयकुमार गोरे यांच्या पाठपराव्यामुळे मिळाला आहे. आता या भागात जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात सुरू होत आहेत. त्यासाठी आमदार जयकुमार गोरे यांचा सत्कार ठेवण्यात आला होता. यावेळी एका गावांतील कार्यक्रमात गोरे यांनी हे विधान केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com