Drive 20 Km Toll-Free: आता 20 किमीपर्यंत टोल फ्री प्रवास, केंद्र सरकारचा मोठा निर्णय; महाराष्ट्रात कोणत्या रस्त्यांवर टोलमुक्ती?

Central Government News: तुम्ही रस्त्याने प्रवास करत असताना टोलमुळे हैराण झाला असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे...आता 20 किलोमीटरपर्यंत एक रुपयाही टोल भरावा लागणार नाही. यासंदर्भात स्थानिकांना दिलासा देण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने हा निर्णय घेतलाय.
आता 20 किमीपर्यंत टोल फ्री प्रवास, केंद्र सरकारचा मोठा निर्णय; महाराष्ट्रात कोणत्या रस्त्यांवर टोलमुक्ती?
Mumbai Pune Toll NakaSaam Tv
Published On

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने राष्ट्रीय महामार्ग शुल्क नियमांमध्ये मोठे बदल केलेत. नवीन नियम, राष्ट्रीय महामार्ग सुधारणा नियम 2024 या नावाने ओळखला जाईल. या नियमांतर्गत राष्ट्रीय महमार्गांवर सुरुवातीचे 20 किलोमीटर टोल फ्री धोरण लागू करण्यात आलंय.

यापूर्वी जुलै महिन्यात रस्ते मंत्रालयाने FASTag सोबतच प्रायोगित तत्त्वावर ग्लोबल नेव्हिगेशन सिस्टम (GNSS) नुसार टोल संकलन प्रणाली लागू करण्याची घोषणा केली होती. नवीन नियमांनुसार 20 किलोमीटरपर्यंत मोफत प्रवास करायचा असल्यास GNSS चा अवलंब करावा लागणार आहे. यामुळे आता राष्ट्रीय महामार्ग, बायपास रस्ता, बोगद्यातील रस्त्यांवर टोल फ्री प्रवास करता येणार आहे. तसेच 20 किलोमीटरपेक्षा जास्त अंतर पार केल्यास टोल वसुली केली जाणार आहे.

आता 20 किमीपर्यंत टोल फ्री प्रवास, केंद्र सरकारचा मोठा निर्णय; महाराष्ट्रात कोणत्या रस्त्यांवर टोलमुक्ती?
Most Searched Topics On Google: वृद्ध व्यक्ती गुगलवर 'या' गोष्टी करतात अधिक सर्च, माहिती आली समोर

या बदलांचा उद्देश हा जवळच्या प्रवासासाठी वाहनधारकांवरील आर्थिक बोजा कमी करण्यासाठी आहे. लांबच्या प्रवासासाठी योग्य ते शुल्क आकारले जाणार आहे. महाराष्ट्रात याचा कोणत्या रस्त्यांवर फायदा होणार ते जाणून घेऊ...

महाराष्ट्रात फायदा कुठे?

NH-4 मुंबई ते पुणे 375 किमी. (चेन्नईपर्यंत)

NH-3 मुंबई ते धुळे 391 किमी. (आग्रापर्यंत)

NH-6 धुळे ते नागपूर 686 किमी. (कोलकातापर्यंत)

NH-8 मुंबई ते भायंदर 128 किमी. (दिल्लीपर्यंत)

NH-17 पनवेल ते पणजी 482 किमी. (मंगळुरुपर्यंत)

NH-50 पुणे ते नाशिक 192 किमी. (संगमनेर मार्गे)

NH-204 कोल्हापूर ते रत्नागिरी 974 किमी. (कोल्हापूर आणि लातूर मार्गे)

NH-211 सोलापूर ते धुळे (समृद्धी महामार्गाचा काही भाग)

आता 20 किमीपर्यंत टोल फ्री प्रवास, केंद्र सरकारचा मोठा निर्णय; महाराष्ट्रात कोणत्या रस्त्यांवर टोलमुक्ती?
Maharashtra Politics : शिंदे गटाचा 120 जागांवर दावा, अजित पवार गटाने केली इतक्या जागांची मागणी; भाजपची भूमिका काय?

राज्यात टोलमाफी कधी असा सवाल नेहमीच विचारला जातो. मनसेनं टोलमाफीसाठी आक्रमकपणे आंदोलनंही केली. मात्र केंद्रानं घेतलेला निर्णय राज्यात लागू केल्यास याचा निश्चितच फायदा होऊ शकतो, मात्र सध्यातरी कर्नाटकात NH-275 बेंगळुरु-मैसूर सेक्शन आणि हरियाणात NH-709 पानीपत-हिसार सेक्शनसाठी हा निर्णय लागू असणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रालाही या निर्णयाची प्रतीक्षा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com