साहेब... ही मदत नकोय, चेक परत घ्या; पूरग्रस्तांनी नाकारली मदत

सानुग्रह निधीची दिलेल्या रकमेत कुठलीच व्यवस्था उभी होत नसल्याने या नागरिकांनी हे धनादेश परत केले. मात्र, हे धनादेश आरडीसी संजय खडसे यांनी स्वीकारले नाही.
साहेब... ही मदत नकोय, चेक परत घ्या; पूरग्रस्तांनी नाकारली मदत
साहेब... ही मदत नकोय, चेक परत घ्या; पूरग्रस्तांनी नाकारली मदतअँड.जयेश गावंडे

अकोला : पूरग्रस्तांना देण्यात आलेले सानुग्रह निधीचे धनादेश कमी असल्याने आज हे धनादेश यावलखेड आणि अंबिका नगरातील नागरिकांनी निवासी उपजिल्हाधिकारी यांना आज परत केले. सानुग्रह निधीची दिलेल्या रकमेत कुठलीच व्यवस्था उभी होत नसल्याने या नागरिकांनी हे धनादेश परत केले आहेत मात्र, हे धनादेश आरडीसी संजय खडसे यांनी स्वीकारले नाही. जवळपास 50 च्या वर नागरिक जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. No help withdraw the check Flood victims refuse help

जिल्ह्यात 21 व 22 जुलै रोजी अतिवृष्टी झाली होती. या अतिवृष्टीमुळेHeavy Rain दहा हजार नागरिकांच्या घराचे नुकसानLoss झाले आहे. तसेच 60 हजार हेक्टर वरील शेतीचे नुकसान झाले आहे. या सर्वांचे पंचनामेPunchnama करून त्यांना तातडीने मदत करावी, असे आदेश पालकमंत्री बच्चू कडू यांनी जिल्हा प्रशासनाला दिले होते. त्यासोबतच शिवसेनेनेहीShivsena मदत देण्यात आली नाही, म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन केले होते. त्यानंतर प्रशासनाने तातडीने पावले उचलत सानुग्रह निधीचे धनादेश नागरिकांना दिले. पाच हजार रुपयांची सानुग्रह रक्कम आहे.

साहेब... ही मदत नकोय, चेक परत घ्या; पूरग्रस्तांनी नाकारली मदत
'कारखान्यांची मालमत्ता, साखर ताब्यात घ्या'; पण ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे द्या!

परंतु, यावलखेड येथील तसेच शहरातील अंबिका नगरातील घरांची पडझड व त्यांच्या घरात पाणी गेली होती. त्यासाठी त्यांना मदत म्हणून सानुग्रह निधी म्हणून पाच हजार रुपयांचे धनादेश देण्यात आले. परंतु, या धनादेशातून कुठलीच गरज पूर्ण होत नाही आहे. त्यामुळे शासनाने एकतर या सानुग्रह निधीच्या रकमेत वाढ करावी किंवा ती इतक्या कमी प्रमाणात रक्कम देऊन नुकसान ग्रस्तांची खिल्ली उडवू नये,असे म्हणत या नागरिकांनी निवासी उपजिल्हाधिकारीDeputy Collector संजय खडसे यांचे कार्यालय गाठले. तसेच ते धनादेश परत केले. परंतु, निवासी उपजिल्हाधिकारी यांनी हे धनादेश परत घेण्यास नकार दिला. हे धनादेश तुमच्याकडेच ठेवा, असे त्यांनी नुकसानग्रस्तना म्हटले त्यामुळे नुकसानग्रस्तानचा हिरमोड झाला.

Edited By- Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com