
सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष तथा बहुजन चळवळीचे जेष्ठ विचारवंत प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद सध्या राज्याभर उलटत आहेत. संभाजी ब्रिगेडसह पुरोगामी विचारांच्या कार्यकर्त्यांकडून राज्यभर आंदोलन केली जात आहे. अशातच आता संभाजी ब्रिगेडने प्रसिद्धी पत्र काढले असून संघटनेच्या नावात कानामात्राचाही बदल करणार नाही, असे या संघटनेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
संभाजी ब्रिगेड संघटनेकडून परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. 'मुद्द्याला मुद्द्याने व मुद्द्याला बुद्ध यांनी उत्तर देणे हा संभाजी ब्रिगेडचा इतिहास आहे. आम्ही या पत्रकातून स्पष्ट करत आहोत की काही झालं तरी आम्ही आमच्या संघटनेच्या नावात कानामात्राचाही बदल करणार नाहीत. या गुंडांना छत्रपती संभाजी महाराजांबद्दल एवढे प्रेम होतं तर त्यांचे प्रेम श्रीपाद छिंदम, राज्यपाल भगतसिंग कोशारी, राहुल सोलापूरकर, प्रशांत कोरटकर यांच्या प्रकरणात कुठे गेले होते.', असा सवाल संभाजी ब्रिगेड संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. संभाजी ब्रिगेड यापुढे जोमाने काम करेल, असं देखील संघटनेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा राज्यभरात निषेध केला जात आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता येथे संभाजी ब्रिगेडसह पुरोगामी विचारांच्या कार्यकर्त्यांनी तहसीलदारांना निवेदन देत या हल्ल्याचा निषेध केलाय. प्रविण गायकवाड यांच्यावरील हल्ला म्हणजे शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर विचारधारेवर हल्ला आहे. आम्ही कायद्याला आणि संविधानाला मानतो याचा अर्थ आम्ही निमुटपणे अन्याय सहन करणार नाही.'
तसंच, 'यापुढे पुरोगामी विचारांवर हल्ला केला तर जशास तसे उत्तर देऊ. हल्लेखोर हे सरकार पुरस्कृत आहेत का?', असा संशय सामान्य पुरोगामी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. सरकारने हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी अन्यथा संभाजी ब्रिगेडसह सर्व पुरोगामी संघटांनतर्फे मोठे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आलाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.