NIA Raid in Pune and Amravati : एनआयएची पुणे, अमरावतीत छापेमारी; शिक्षकाच्या मुलासह दोन तरूण ताब्यात

NIA Raid in Pune and Amravati : पुण्यातून NIAने १९ वर्षीय साफवान शेख या विद्यार्थ्याला ताब्यात घेतलं आहे. एनआयएकडून त्याची चौकशी सुरु आहे. पुलगेटच्या अरिहंत कॅालेजचा हा विद्यार्थी आहे.
NIA News
NIA NewsSaam tv
Published On

अमर घटारे/नितीन पाटणकर

NIA Raid in Pune and Amravati :

राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएने पुणे आणि अमरावती येथून दोन तरुणांना ताब्यात घेतलं आहे. अमरावतीच्या अचलपूर शहरमध्ये मध्यरात्री NIAने छापेमारी केली. तर पुण्यातील गुलटेकडी परिसरात NIA छापा टाकला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पुण्यातून एनआयने १९ वर्षीय साफवान शेख या विद्यार्थ्याला ताब्यात घेतलं आहे. एनआयएकडून त्याची चौकशी सुरु आहे. पुलगेटच्या अरिहंत कॅालेजचा हा विद्यार्थी आहे. त्याच्याकडून मोबाईल आणि इलेक्ट्रॅानिक डिव्हाइस जप्त करण्यात आले आहेत. साफवान बंगळुरुमधील इसिस मॅाड्यूलच्या टेलिग्राम गृपमध्ये सहभागी असल्याने चौकशी सुरु आहे. (Latest Marathi News)

NIA News
Maharashtra Political News : सेंटलमेंट नीट होत नाही म्हणून मोर्चा काढला का? राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंवर झोंबणारी टीका

NIA च्या कर्नाटकातील बंगळुरुमधील पथकाने ही कारवाई केली आहे. छाप्यात NIA ने संशयास्पद वस्तू जप्त केल्या आहेत. गेल्या आठवड्यात मुंबई पुणे आणि राज्यभरात NIAच्या छापेमारीनंतर आज पुण्यात मोठी छापेमारी सुरू आहे. पुण्यातील कोथरुड भागात 18 मे रोजी दोन अतिरेक्यांना अटक केली होती. गेल्या आठवड्यात 15 संशयितांना ठाणे जिल्ह्यातून ताब्यात घेण्यात आलं होतं.

NIA News
Beed Fraud News: फायनान्स कंपनीला गंडा! बनावट सोने देऊन घेतले २१ लाखांचे कर्ज, ७ जणांवर गुन्हा दाखल

अमरावतीतूनही एक विद्यार्थी ताब्यात

अमरावतीमध्येही एनआयएने मोठी कारवाई केली आहे. एका शिक्षकाच्या मुलाला एनआयने ताब्यात घेतलं आहे. विद्यार्थी दहशतवादी कारवायांमध्ये गुंतलेला असावा असा संशय NIA ला आहे. सध्या अमरावती येथील जोग क्रीडा संकुल पोलीस मुख्यालयामध्ये त्याची कसून चौकशी सुरू आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com