Buldhana: निकृष्ट दर्जाचे बांधकाम केल्यानेच पाण्याची टाकी काेसळली,'स्वाभिमानी'ची दाेषींवर कारवाईची मागणी

new build water tank collapsed in sangrampur near buldhana: ही पाण्याची टाकी नुकतीच अचानक कोसळल्याने संग्रामपूर तालुक्यातील गावकरी आश्चर्य व्यक्त करु लागले आहेत.
new build water tank collapsed in sangrampur
new build water tank collapsed in sangrampurSaam Digital

बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात निर्माणाधिन पाण्याची टाकी कोसळल्याने एकच खळबळ उडाली. दरम्यान निकृष्ट बांधकाम झाल्याने टाकी काेसळल्याचा आराेप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते प्रशांत डिक्कर यांनी साम टीव्हीशी बाेलताना केला.

शासनाच्या जल जीवन मिशन योजनेअंतर्गत संग्रामपूर तालुक्यातील आदिवासी बहुल असलेल्या चिचारी या गावात पाण्याची टाकी बांधण्यात येत होती. जवळपास 95 टक्के या पाण्याच्या टाकीचे काम पूर्णही झालं होतं.

new build water tank collapsed in sangrampur
Hatkanangale Election Result: हातकणंगलेत का झाला पराभव? राजू शेट्टींनी स्वत:च सांगितले (पाहा व्हिडिओ)

ही पाण्याची टाकी नुकतीच अचानक कोसळल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान जलजीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यात बांधण्यात येत असलेल्या पाण्याच्या टाक्या या निकृष्ट दर्जाच्या असून या सर्व प्रकाराची चौकशी होणे गरजेचे आहे. चौकशी करून 24 तासात दोषींवर कारवाईत न झाल्यास जिल्ह्यात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांनी दिला आहे.

Edited By : Siddharth Latkar

new build water tank collapsed in sangrampur
शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी, नाफेडचे कांदा भाव निश्चितीचे अधिकार काढले,(पाहा व्हिडिओ)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com