MBBSसाठी NEETसोबत 12वीचे गुणही महत्त्वाचे? अनेक राज्यांचा निलेकणी समितीकडे प्रस्ताव

Major Change in Medical Admissions: MBBS आणि इतर वैद्यकीय प्रवेशासाठी आता नीटसोबत १२ वीच्या परीक्षेचे गुणही ग्राह्य धरले जाण्याची शक्यता आहे. एलढा मोठा बदल कशामुळे होणार आहे? शिक्षण तज्ञ आणि विद्यार्थ्यांच्या काय प्रतिक्रीया आहेत? पाहूया एक रिपोर्ट....
NEET UG admission rules 2026
NEET UG admission rules 2026saam tv
Published On: 

नीट पेपरफुटीचा घोटाळा उघड झाला आणि या परीक्षांमध्ये सुधारणा करण्यासाठी सरकारनं नंदन निलेकणी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली. मात्र आता या समितीमुळे केवळ नीटच्याच परीक्षा नीट होणार नाहीत तर कॉलेज आणि खासजी क्लालेसचं इंटिग्रेटेडच्या नावाखाली सुरू असलेल्या लुटीलाही चाप बसण्याची शक्यता आहे. कारण नीटसोबत १२ वीच्या परीक्षांचे गुणही वैद्यकीय प्रवेशासाठी ग्राह्य धरले जाण्याची शक्यता आहे. अनेक राज्यांनी याबाबत निलेकणी समितीकडे आग्रह धरला असून तसा प्रस्तावच समितीपुढे ठेवलाय. कोणता प्रस्ताव मांडण्यात आलाय ते पाहुयात...

MBBSसाठी 12वीचे गुणही महत्त्वाचे?

- NEET-UG परीक्षेसोबत 12वीच्या बोर्डाच्या गुणांचाही विचार करण्याचा राज्यांचा प्रस्ताव

- परीक्षा सुधारणांसंदर्भात स्थापन केलेल्या नंदन निलेकणींच्या नेतृत्वाखालील कृती दलाकडे प्रस्ताव

- वर्षभरात एकापेक्षा जास्त वेळा NEET परीक्षा देण्याचा पर्याय उपलब्ध करण्यावर भर

- दक्षिणेकडील सर्व राज्यांनी CBT पद्धतीनं परीक्षा घेण्यास सहमती दर्शवली

- वाढणारे कोचिंग क्लासेसचं महत्त्व आणि डमी शाळांचं प्रमाण रोखण्यासाठी बदल होण्याची शक्यता

या प्रस्तावाचं शिक्षण तज्ञांनीही स्वागत केलंय. यामुळे बारावीची परीक्षा आणि महाविद्यालयांचं महत्व अबाधित राहणार आहे. बारावी आणि नीटचा अभ्यासक्रम एक राहिला तर विद्यार्थ्यांना कुठली ही अडचण येणार नाही, असं मत शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केलंय. MBBS-BDS सारख्या वैद्यकीय प्रवेशासाठी नीट परीक्षेचं महत्व वाढल्याने विद्यार्थी बारावीची परीक्षा गांभीर्याने घेत नाहीत हे वास्तव आहे. या प्रस्तावावर विद्यार्थ्यांनीही प्रतिक्रीया दिल्या आहेत.

बारावीत केवळ उत्तीर्ण होण्यापुरते गुण मिळवून सगळे लक्ष नीटच्या परीक्षेवर देतात. त्यामुळे १२ वीची महाविद्यालयं केवळ नामधारी राहिलेले आहेत. मात्र यातूनच इंटिग्रेटेडचं पेव फुटलं असून खासगी क्लासेस आणि कॉलेजेसच्या साट्यलोट्यातून विद्यार्थी आणि पालकांची लूट सुरू आहे.

अनेक शहरांमध्ये जाहीरातबाजी करुन मुलांना जाळ्यात ओढण्याची स्पर्धाच सुरु झाली आहे. त्यामुळे 12 वीचे गुण ग्राह्य धरले तर कॉेलेजेसना पुन्हा महत्त्व प्राप्त होईल आणि खासगी क्लासेसच्या लुटीला आळा बसण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.