राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अनेक वेळा मुख्यमंत्री पदाने हुलकावणी दिली. ते सर्वाधिक वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री राहिले आहेत आणि सध्या त्यांची उपमुख्यमंत्रीपदाची पाचवी टर्म आहे. दादांचा २२ जुलैला वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला पिंपरीतील कार्यकर्त्यांनी तयार केलेला खास केक चर्चेत आलाय. पाहूया एक रिपोर्ट.
वाचलंत....मी अजित आशा अनंतराव पवार महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की....हा आशय एकप्रकारे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या भावना व्यक्त करतोय. मुख्यमंत्रीपदासाठी नेहमी चर्चेत असलेल्या अजित पवारांना त्यांच्या कार्यकर्त्यांनी वाढदिवसानिमित्त का होईन पण मुख्यमंत्री केलंच..सर्वाधिक पाच वेळा उपमुख्यमंत्री राहिलेले अजित पवारांचीही मुख्यमंत्री होण्याची महत्वकांक्षा कधी लपून राहिली नाही. काही महिन्यांपूर्वी तर त्यांच्या आईनेही दादा सीएम व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली होती.
लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला अपयश आलं. रायगडमध्ये सुनील तटकरेंच्या रुपानं केवळ एक खासदार निवडून आला. बारामतीतही अजित पवारांची पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला. मात्र आता विधानसभेसाठी पक्ष नव्या जोमानं सज्ज झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 22 जुलै रोजी वाढदिवस आहे. यानिमित्ताने पूर्वसंध्येला सांगवीमध्ये कार्यकर्त्यांनी हा खास केक तयार केला होता. अजित पवारांनी हा केक कापताच कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला.
पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उपस्थितीत कार्यकर्ता निर्धार मेळावा झाला. अजित पवारांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांनीही 65 किलोचा केक तयार केला होता. हा केक सुद्धा अजित पवारांच्या हस्ते कापण्यात आला. दरम्यान आमदार अतुल बेनके यांच्यानंतर अण्णा बनसोडे यांनीही अजित पवार आणि शरद पवार एकत्र आल्यास आनंद होईल, अशी इच्छा बोलून दाखवलीये. आता दादांनी कार्यकर्त्यांनी तयार केलेला हा खास केक तर कापला आहे पाहूया दादा मुख्यमंत्री होतात का? कारण विधानसभेचं घोडामैदान फार दूर नाही..
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.