रायगड लोकसभा मतदारसंघावर पुन्हा एकदा भाजपने दावा केला आहे. ही जागा भाजपलाच मिळावी असा सूर भाजप नेते तसेच पदाधिकारी लावत आहेत. सुनील तटकरे यांच्यापेक्षा आमची ताकद जास्त असल्याने उमेदवारी का मागू नये? असा सवालच धैर्यशील पाटील यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे रायगडच्या लोकसभा जागेवरून पुन्हा सत्ताधारी पक्षातच कलगीतुरा सुरू झाला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
रायगड लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि विद्यमान खासदार सुनील तटकरे यांचा बालेकिल्ला आहे. विरोधक आणि मित्रपक्ष यांची गरजेप्रमाणे मोट बांधत तटकरे यांनी या मतदारसंघावर वेळोवेळी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. (Latest Marathi News)
मात्र आता या मतदारसंघावर भाजप कार्यकर्ते आपला दावा सांगत आहेत. आमदार धैर्यशील पाटील यांच्या नावाने भावी खासदार अशा घोषणा दिल्या जात आहेत. जुने मित्र आता तटकरे यांच्यासोबत नाहीत, असं सांगत पाटील कार्यकर्त्यांना ताकद देत तटकरे (Sunil Tatkare) यांचा सिटींग असल्याचा दावा नाकारत आहेत.
दरम्यान, भाजप रायगड लोकसभेसाठी तयारीला लागला असताना सिटींग खासदार सुनील तटकरे यांनी देखील आता चुप्पी तोडली आहे. दिल्लीत जायला आपण तयार असल्याचं तटकरे यांनी म्हटलं आहे. दिल्लीत मन रमु लागलंय अस सांगताना तटकरे यांनी केंद्रात NDA चे सरकार येणार असल्याचे भाकीत केले आहे.
दुसरीकडे ठाकरे गटाने रायगड लोकसभेसाठी जोरदार तयारी केली आहे. उद्धव ठाकरे यांनी येथून माजी खासदार अनंत गिते यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे विरोधक कुणीही असला, तरी विजय माझाच होणार, रायगडचा खासदार मीच होणार, असा दावा अनंत गीते यांनी केला आहे.
अनंत गीते यांच्याकडून व्यक्त होणारा विजयाचा विश्वास, प्रस्तापित असून लोकसभेच्या उमेदवारीबाबत बोलण टाळणाऱ्या खासदार सुनील तटकरे यांनी दिल्लीत जायला तयारी दाखवली आहे. मित्रपक्षाच्या वाट्याला उमेदवारी असताना त्यावर हक्क सांगणारे भाजप कार्यकर्ते यामुळे रायगडच्या राजकारणाबाबत कार्यकर्ते, मतदार आणि सर्वसामान्य जनता यांच्यामध्ये संभ्रम चर्चांना उधाण आले आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.