सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीत अंतर्गत कलह? पार्थ पवार यांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?

parth pawar on ncp row : सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीत अंतर्गत कलह सुरू असल्याची जोरदार चर्चा आहे. परंतु पार्थ पवार यांनी पोस्ट करत दावा फेटाळून लावला आहे.
parth pawar
parth pawar on ncp row : Saam tv
Published On
Summary

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद असल्याची चर्चा

सुनेत्रा पवार यांनी आयोगाला दिलेल्या पत्रामुळे सुरू झाली चर्चा

पार्थ पवार यांनी राष्ट्रवादीतील वादाचे सर्व आरोप फेटाळले

सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह सुरू असल्याचा दावा केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधून प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना पक्षातील महत्वाच्या पदावरून हटवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. राष्ट्रवादीतील अतंर्गत वादाच्या चर्चेदरम्यान राष्ट्रवादीचे खासदार पार्थ पवार यांनी पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद सुरू असल्याचा दावा फेटाळून लावला आहे.

parth pawar
रायगडमध्ये राष्ट्रवादीच्या बॅनरवरून अजित पवार आणि सुनेत्रा पवारांचा फोटो गायब; राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं होतं. या पत्रात प्रफुल्ल पटेल यांच्या नावापुढे राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून उल्लेख टाळल्याचे समोर आलं होतं. तर सुनील तटकरे यांच्या नावापुढे प्रदेशाध्यक्षपद टाळण्यात आले होते. त्यानंतर राजकीय वर्तुळात प्रफुल्ल पटेल यांना कार्याध्यक्षपदावरून हटवल्याची चर्चा सुरू झाली होती.

parth pawar
Sunetra Pawar: राजकीय घडामोडींना वेग, सुनेत्रा पवार दिल्लीत दाखल; भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची भेट घेणार?

खासदार पार्थ पवार यांनी 'एक्स'वर पोस्ट करत प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या चर्चेवर भाष्य केलं आहे. पार्थ पवार यांनी म्हटलं आहे की, 'प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याविरोधातील वृत्त निराधार आणि काल्पनिक आहेत. त्यांचं अनेक दशकांचं अढळ कार्य आणि नेतृत्वामुळे आजही मार्गदर्शन मिळतं. दोन्ही ज्येष्ठ नेत्यांना हेतूपुरस्पर निर्माण केलेल्या वादांमध्ये ओढणे दुर्दैवी असून या गोष्टीचा निषेध केला पाहिजे'.

Q

राष्ट्रवादीत अंतर्गत वाद सुरू असल्याची चर्चा का झाली?

A

सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रात काही नेत्यांच्या पदांचा उल्लेख टाळला होता, त्यानंतर ही चर्चा सुरू झाली.

Q

पार्थ पवार यांनी यावर काय प्रतिक्रिया दिली?

A

पार्थ पवार यांनी राष्ट्रवादीतील अंतर्गत वादाच्या सर्व चर्चांना फेटाळून लावल्या. त्यांनी सर्व चर्चा निराधार असल्याचं म्हटलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com