'काव काव केल्याने कोणी कोयल होत नाही'; ठोंबरेंना सारंग यांचं प्रत्युत्तर, जागावाटपावरून राष्ट्रवादीत वाद चिघळला

Ncp Seat-sharing Row: पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या जागावाटपावरून राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत वाद चिघळला आहे. रुपाली ठोंबरे पाटील यांच्या सुनील तटकरे यांच्यावरील टीकेला सलीम सारंग यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
Ncp Seat-sharing Row:
Ncp Seat-sharing Row: Salim Sarang Hits Back At Rupali Thombre Patilsaam tv
Published On: 

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतील जागावाटपावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी स्वतःच्या पक्षाच्या वरिष्ठ नेते सुनील तटकरे यांना घरचा आहेर दिला आहे. रुपाली ठोंबरे पाटील यांनी तटकरे यांच्यावर बोलताना “हे सामूहिक अपयश नाही, हे तुमचंच अपयश आहे” असे म्हणत त्यांच्यावर निशाणा साधला. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष सलीम सारंग म्हणाले की, पक्षातील वरिष्ठ नेत्यांवर टीका करण्यापूर्वी प्रत्येकाने स्वतःची राजकीय पात्रता, अनुभव आणि पक्षासाठी केलेले योगदान तपासले पाहिजे.

वरिष्ठ नेत्यांच्या निर्णयांवर प्रश्न उपस्थित करताना पक्षाच्या अंतर्गत बाबी माध्यमांसमोर मांडण्याची पद्धत योग्य नाही. मतभेद असतील तर ते पक्षाच्या व्यासपीठावर मांडावेत, मात्र सार्वजनिकपणे वरिष्ठ नेत्यांवर टीका करून पक्षाची प्रतिमा आणि संघटना कमकुवत करण्याचे काम कुणीही करू नये, असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सलीम सारंग यांनी व्यक्त केले.

अजितदादांच्या निधनानंतर पक्षातील काही छोट्या पदांवरील कार्यकर्ते आणि पदाधिकारी आपापसात उलटसुलट चर्चा करून वरिष्ठ नेत्यांविरोधात वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. मात्र सुनेत्रावहिनी पवार, सुनील तटकरे साहेब आणि पक्षातील इतर वरिष्ठ नेत्यांमध्ये चांगला समन्वय असून, पक्षाच्या हितासाठी महत्त्वाचे निर्णय सामूहिकपणे घेतले जात आहेत. त्यामुळे काही व्यक्तींच्या वक्तव्यांमुळे पक्षात गैरसमज निर्माण होऊ देणे योग्य नाही.

सुनील तटकरे यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांच्या अनुभवाच्या जवळपासही आपला राजकीय अनुभव नसताना त्यांच्याबद्दल बोलताना प्रत्येकाने आपल्या शब्दांचे भान ठेवले पाहिजे. केवळ वरिष्ठ नेत्यांवर टीका करून किंवा माध्यमांमध्ये प्रसिद्धी मिळवून कोणीही मोठा नेता होत नाही.

पक्षातील वरिष्ठांवर टीका करून स्वतःचे राजकीय महत्त्व वाढवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना उद्देशून सारंग म्हणाले की, “काव काव केल्याने कोणी कोयल होत नाही; शेवटी कावळाच म्हणून ओळखला जातो.” त्यामुळे ज्यांच्याकडे पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वावर भाष्य करण्याची पात्रता आणि अनुभव नाही, त्यांनी प्रसिद्धीसाठी बेजबाबदार वक्तव्ये करण्यापेक्षा पक्षाच्या संघटनात्मक शिस्तीचा विचार करावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com