Maharashtra Politics: अजित पवारांचं बंड, राष्ट्रवादी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक; फुटीर नेत्यांच्या बॅनरला काळं फासलं

अजित पवारांचं बंड, राष्ट्रवादी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक; फुटीर नेत्यांच्या बॅनरला काळं फासलं
NCP party workers aggressive after Ajit Pawar rebellion
NCP party workers aggressive after Ajit Pawar rebellionSaam Tv
Published On: 

Maharashtra Politics: राज्याच्या राजकारणात आज मोठी घटना घडली आहे. राष्ट्रवादीत मोठी फूट पाडून विरोधी पक्षनेते असलेल्या अजित पवारांनी थेट उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन सत्तेत प्रवेश केला.

अजित पवारांच्या या बंडानंतर राष्ट्रवादी कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. अजित पवार आणि त्यांच्यासोबत बंडात सामील असलेल्या नेत्यांच्या फोटोना कार्यकर्त्यांनी राज्यभरात काळ फासायला सुरुवात केली आहे.

NCP party workers aggressive after Ajit Pawar rebellion
Maharashtra Politics: शरद पवार यांचा अॅक्शन प्लान रेडी; अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांशी साधला संपर्क; २०१९ ची पुनरावृत्ती?

आज राष्ट्रवादी कार्यालयामध्ये बंडखोर नेत्यांच्या बॅनरला काळं फासण्यात आलं आहे. अजित पवारांसोबत ज्या नऊ मंत्र्यांनी शपथ घेतली त्यांच्या बॅनरवरील फोटोंना आक्रमक कार्यकर्त्यांनी काळं फासलं. (Latest Marathi News)

आव्हाडांनी बंडखोरांच्या फोटोला फासलेलं काळं पुसलं

राष्ट्रवादी कार्यालयात बंडखोर नेत्यांचे लागलेले फोटो काढून त्यावर कार्यकर्त्यांनी काळं फासलं होतं. यानंतर मात्र नुकतेच विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती करण्यात आलेले राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी स्वतः काळं फासण्यात आलेले फोटो पुसले.

NCP party workers aggressive after Ajit Pawar rebellion
Maharashtra Politics: शिंदेंना आटोक्यात ठेवण्यासाठी भाजपचा डाव? काय म्हणाले जयंत पाटील?

यावेळी ते म्हणाले होते की, ही शरद पवार यांची ही शिकवण नाही. म्हणून आम्ही असं कुठलंही कृत्य करणार नाही. आम्ही अजूनही त्यांच्या संपर्कात आहोत. लवकरच परिस्थिती आधी सारखी होईल, असं ते म्हटले होते. यातच आक्रमक कार्यकर्त्यांना सांभाळण्याचं काम वरिष्ठ नेते करताना पाहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com