शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यावर गोळीबार केल्याप्रकरणी भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हिललाईन पोलिसांनी आमदार गायकवाड यांच्यासह तीन जणांना अटक देखील केली आहे. गायकवाड यांच्या अटकेनंतर आता त्यांची आमदारकी जाण्याची शक्यता आहे. दरम्यान या घटनेनंतर शरद पवार यांनी अशा प्रकारच्या घटना महाराष्ट्रासाठी घातक आणि चिंताजनक असल्याची पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
गणपत गायकवाड कल्याण पूर्व भागातील आमदार आहेत. तसेच सत्ताधारी गटात असतानाही कायदा हातात घेतला आहे. मात्र कायदा हातात घेणाऱ्याविरोधात यंत्रणांचा गैरवापर होत आहे. अशा प्रकरणांच्या सर्वच घटनांमध्ये राज्य सरकारची बघ्याची भूमिका वाटतेय, त्यामुळे त्या भागातील नागरिकांच्या आणि एकंदर राज्यातील जनतेच्या दृष्टीने अशा घटना घातक आहेत. कायदा सुव्यवस्थेसाठी मारक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
(साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
मुंबईच्या उल्हासनगर परिसरातून शुक्रवारी मध्यरात्री भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, हिललाईन पोलीस ठाण्यातच हा प्रकार थरारक प्रकार घडल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या गोळीबारात महेश गायकवाड आणि राहुल पाटील गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर ठाण्यातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. महेश गायकवाड यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं कळतंय.
कल्याण पूर्वेत शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड आणि भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्यात नेहमीच वादावादी तसेच आरोप प्रत्यारोप होत होते. वरिष्ठांनी मध्यस्थ केल्यानंतर देखील दोघांमधील धूसफूस कायम होती . शुक्रवारी रात्रीच्या सुमारास दोन्ही नेते पुन्हा आमने-सामने आले. गोळीबाराची माहिती मिळताच भाजपसह शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयासमोरच मोठी गर्दी केली होती. दुसरीकडे सत्ताधारी पक्षातील आमदाराची गोळीबार करण्यापर्यंत मजल जातेच कशी? असा संतप्त सवाल नागरिक आणि विरोधी पक्षांकडून उपस्थित केला जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.