Sangli : सांगलीत खळबळ, राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यानं टोकाचे पाऊल उचलले, घरातच गळफास घेत...

Sangli Suresh Patil : सांगलीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुरेश पाटील यांनी गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सध्या त्यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे सांगलीच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
Sangli Suresh Patil
Sangli Suresh PatilSangli Suresh Patil
Published On

NCP Former mayor Suresh Patil ICU treatment : सांगलीमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी महापौर सुरेश पाटील यांनी टोकाचे पाऊल उचलल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. सुरेश पाटील यांनी आपल्या निवासस्थानी साडीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना समोर येताच कुटुंबीयांनी तातडीने त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. सुरेश पाटील यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे समजतेय.

सुरेश पाटील यांनी टोकाचे पाऊल का उचलले? याबाबत अद्याप कोणतेही ठोस कारण समोर आलेले नाही. या घटनेने सांगलीतील राजकीय वर्तुळात आणि नागरिकांमध्ये एकच चर्चा सुरू झाली आहे. सुरेश पाटील हे शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात होते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षात उभी फूट पडल्यानंतर त्यांनी अजित पवार यांच्या गटात सामील होण्याचा निर्णय घेतला होता.

Sangli Suresh Patil
Sangli ZP : महिला कर्मचाऱ्यांच्या बालकांच्या संगोपनासाठी पाळणाघर; सांगली जिल्हा परिषदेचा उपक्रम

सुरेश पाटील हे सांगलीच्या राजकारणातील एक प्रभावशाली नाव आहे. महापौरपदासह त्यांनी अनेक जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या होत्या. त्यांच्या या कृतीमुळे त्यांचे समर्थक आणि कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, अधिक माहितीच्या प्रतीक्षेत आहेत. ही घटना सांगलीच्या राजकीय इतिहासातील एक गंभीर प्रसंग ठरली आहे.

Sangli Suresh Patil
Sangli: रावणाची बहिण 'त्राटिकाच्या' सोंगाची यात्रा; २०० वर्षांपूर्वीची परंपरा, बेडग गावची अनोखी प्रथा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com