Sangli: रावणाची बहिण 'त्राटिकाच्या' सोंगाची यात्रा; २०० वर्षांपूर्वीची परंपरा, बेडग गावची अनोखी प्रथा

Sangli Ram Navmi News: उद्या देशभरात रामनवमी साजरी केली जाणार आहे. सांगलीतील बेडग येथे मरगाई देवीच्या यात्रेच्या वेळी रामायणातील कथेचा आधार घेवून 'त्राटकीचे सोंगे सादर केली जातात.
Ram Navmi
Ram Navmi Saam Tv
Published On

विजय पाटील, साम टीव्ही प्रतिनिधी

सांगली जिल्ह्यातील बेडग येथे मरगाई देवीच्या यात्रेच्या वेळी रामायणातील कथेचा आधार घेवून 'त्राटकीचे सोंगे सादर केली जातात. रावणाची बहिण 'त्राटिका' आणि तिच्या राज्यकारभार विषयीचे सोंग हे या यात्रेचे प्रमुख वैशिष्ठ्य मानले जाते. अश्या प्रकारचा ह्या सोंगांचा कार्यक्रम संपूर्ण देशात केवळ बेडग या गावात आयोजित केला जातो. गेल्या २०० वर्षा पासून ही यात्रा येथे भरत असते.

Ram Navmi
Ram Navmi 2024: देशासह राज्यात रामनवमीचा मोठा उत्साह, शिर्डीतील साईमंदिरात 'राममय' वातावरण

सांगली जिल्ह्यातील बेडग या गावातील ग्रामदैवत मरगाई देवीची दरवर्षी यात्रा भरवली जाते. गुढीपाडव्या नंतर ही यात्रा असते. गुढीपाडव्या दिवशी गुढीउभारल्या नंतर गावात दळण - कांडप बंद करण्याची परंपरा आहे. देवीची पालखी निघाल्या नंतरच दळण कांडपास सुरुवात होते. अनेक राज्यातून भाविक मोठ्या संख्येने येथील यात्रेसाठी येतात. या यात्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे 'त्राटिकाचे सोंगे' हे आहे. हे त्राटिकाचे सोंग महाराष्ट्रात कुठेही पाहायला मिळत नाही.

रामायणाच्या काळात नाशिकपासून सांगली जिल्ह्यातील दंडोबा यापरिसरात दंडकारण्य होते. या भागात रावणाची बहिण 'त्राटिका'चे राज्य होते. अशी आख्यायिका येथील जाणकार सांगतात. तिच्या राज्य कारभार विषयीचे वर्णन 'त्राटिकाचे सोंगे' ह्या कार्यक्रमा द्वारे सादर केले जाते. तेंव्हा युद्धाच्या वेळी वापरलेले घोडे किंव्हा इतर प्राणीही सोंगाच्या रुपात दाखवले जातात. आणि ही कथा जिवंत केली जाते. हे सोंग घेण्यासाठी १२ बलुतेदार सामील असतात.

Ram Navmi
Mumbai Nashik Highway : मुंबई- नाशिक महामार्ग बंद; वादळी वाऱ्याच्या तडाख्याने वाहतूक खोळंबली, रेल्वे वाहतूकही विस्कळीत

त्राटिकाचे सोंग घेणाऱ्या कलावंताला त्राटिकाचा मुखवट लावला जातो. हा मुखवटा आकर्षक आणि आतिशय सुबक आहे.. ४ ते ५ फुट मरगलवर असणार्या त्राटिकाचे उंची २५ फुट इतकी असते. तिची वेशभूषा आक्राळ विकराळ असते. मोठा मोर पिसारा, मोठे तोंड, १२ साड्या नेसलेली त्राटिका. त्राटिका आपल्या दरबारी असणार्या पंतप्रधान, सेनापती, घोडेस्वार, काळीचूर, बनीचर, मोर यांच्या सह सैनिक घेऊन चौका चौकात दरबार भरवला जातो. रात्री दहा वाजल्यानंतर हा कार्यक्रम सुरु केला जातो. हलगीच्या तालावर हा कार्यक्रम चालतो. त्राटिका काळ्या वेशातील सैनिकांना आपल्या राज्यव्यवस्थेविषयी प्रश्न विचारते. सैनिक विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देतात. मोठ्या उत्साहात हा सोहळा साजरा केला जातो.

Ram Navmi
Sangli News: कृष्णा नदीत गेला अन् परतलाच नाही, मगरीने चेहरा अन् दंडाचा वचपाच काढला; सांगलीत खळबळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com