Ram Navmi 2024: देशासह राज्यात रामनवमीचा मोठा उत्साह, शिर्डीतील साईमंदिरात 'राममय' वातावरण

Ram Navmi Celebrated In Maharashtra: देशभर आज रामनवमीचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. अयोध्येत रामनवमीचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. देशासह राज्यातही अनेक ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शिर्डीतील साईमंदिरात रामनवमीनिमित्ता वेगवेगळे कार्यक्रम साजरे केले जाणार आहेत.
Ram Navmi Celebrated In Maharashtra
Ram Navmi Celebrated In MaharashtraSaam Tv
Published On

देशभर आज रामनवमीचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. अयोध्येत रामनवमीचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. रामनवमीनिमित्त राममंदिराला विद्युत रोशनाई करण्यात आली आहे. लाखो भाविक आज अयोध्येत दाखल झाले आहेत. आज दुपारी १२ वाजता अयोध्येत रामजन्म होणार आहे. देशासह राज्यातही अनेक ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शिर्डीतील साईमंदिरात रामनवमीनिमित्ता वेगवेगळे कार्यक्रम साजरे केले जाणार आहेत.

शिर्डीत रामनवमी उत्सवाची काल पासून भक्तीमय वातावरणात सुरुवात झाली आहे. आज साई दर्शनासाठी लाखो भाविकांची मांदियाळी ही शिर्डीत पाहायला मिळत आहे.  साईनामाचा जयघोष करत शेकडो पायी पालख्या शिर्डीत दाखल झाल्या आहेत. उत्सवासाठी साईबाबा मंदिरावर रोशनाई तसेच साई मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. सकाळी काकड आरती नंतर साईबाबांच्या मुर्तीला भाविकांनी विविध ठिकाणांहून आणलेल्या जलाने अभिषेक घालण्यात येऊन साईंचे मंगलस्नान पार पडेल. जास्तीत जास्त भाविकांना दर्शन मिळावे यासाठी साई समाधी मंदिर आज रात्रभर खुल राहणार आहे..

आज दुपारी 12 वाजता साईमंदिरासमोर रामजन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे. दुपारी 4 वाजता भगव्या आणि हिरव्या ध्वजाची निशाण मिरवणुक निघेल आणि सोन्याच्या रथात गावातुन प्रभु रामचंद्राची आणि साईंच्या प्रतिमेची मिरवणुक काढण्यात येईल.

नाशिकमध्ये राममय वातावरण

रामनवमीनिमित्त नाशिकच्या ऐतिहासिक काळाराम मंदिरात भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी झाली आहे. पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत. रामनवमीच्या निमित्ताने मंदिराच्या गाभाऱ्यात विशेष आरास करण्यात आली आहे.झेंडूच्या फुलांचं तोरण, मंदिराच्या बाहेर खास रांगोळी, मंदिर परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. दर्शनासाठी आलेल्या भाविकांसाठी विशेष सुरक्षा संस्थांच्या माध्यमातून करण्यात आलीये. राम जन्म सोहळ्याची तयारी देखील काळाराम मंदिरात सुरू झाली आहे. काळा पाषाणातील असलेल्या मुर्त्यांना दुधाभिषेक जलाभिषेक करत पूजा केली जात आहे. राम नामाचा जप करत आलेले भाविक मंदिर परिसरात तल्लीन झाल्याचं पाहायला मिळतंय.

Ram Navmi Celebrated In Maharashtra
Eknath Khadse News: एकनाथ खडसे यांना जीवे मारण्याची धमकी; राजकीय वर्तुळात खळबळ

शेगावमध्ये रामनवमीनिमित्त मोठा उत्साह

शेगावमध्येही संत गजानन महाराज मंदिरात १३० वा रामजन्मोत्सव मोठ्या भक्तिभावात साजरा करण्यात येत आहे. या उत्सवासाठी राज्यभरातून शेकडो दिंड्या शेगावात दाखल झाल्या आहेत. सकाळी सात वाजता आरती होऊन सोहळ्याची सुरुवात झाली आहे. तर उत्सवाची मुख्य आरती दुपारी बारा वाजता होईल. या उत्सवानिमित्त संत गजानन महाराज मंदिरात फुलांची सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

Ram Navmi Celebrated In Maharashtra
Maharashtra Weather Forecast: राज्यात मुंबई, ठाण्यासह कोकणाला उष्ण लाटेचा इशारा; विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा अंदाज

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com