Amol Mitkari Nagpur Toilet Video : सध्या नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनात अनेक राजकीय पक्षांकडून विविध मुद्द्यावरून आरोप प्रत्यारोपाच्या फेरी सुरू आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी आमदार निवासातील व्हीडिओ ट्वीट केला आहे. यात एक वेटर आमदारांच्या कपबशा धुण्यासाठी चक्क शौचालयातलं पाणी वापरत असल्याचा आरोप मिटकरी यांनी केला आहे. मिटकरींच्या या व्हिडीओची चांगलीच चर्चा रंगली आहे. (Maharashtra Political News)
काय आहे प्रकरण?
नागपुरात सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात अनेक मुद्द्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलंच घेरलं आहे. अधिवेशनाचे पहिले तीन दिवस विरोधकांनी चांगलेच गाजवले. आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी हिवाळी अधिवेशनातील आमदार निवास्थानातील उपहारगृहातील कपबशा टॉयलेटमध्ये धुतल्या जात असल्याचा आरोप केला आहे.
अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी याबाबतचा व्हिडीओ देखील ट्विट केला आहे. 'हे आहे नागपूर हिवाळी अधिवेशनातील आमदार निवासस्थानातील उपहारगृह. हजारो कोटीचे टेंडर कंत्राट दाराला दिल्यानंतर आमदारांच्या कपबशा धुण्यासाठी कंत्रादारांकडून विशेष टॉयलेटची व्यवस्था.#आझादीकाअमृतमहोत्सव', असं म्हणत मिटकरींनी सत्ताधाऱ्यांवर आरोप केला आहे. (Latest Marathi News)
व्हिडीओत काय आहे?
अमोल मिटकरी यांनी ट्विट केलेला व्हिडीओ एका टॉयलेटमधील आहे. व्हिडीओत एक वेटर कपबशा धुण्यासाठी चक्क टॉयलेटमधील पाणी वापरत असल्याचं दिसून येत आहे. हा वेटर टॉयलेटमधील बेसीनमध्ये कपबशा धूत आहेत. याच कपबशांमध्ये आमदारांना चहा दिला जात असल्याचा आरोप मिटकरींनी केला आहे. मिटकरींनी ट्विट केलेला व्हिडीओ २० सेकंदाचा आहे. आता या व्हिडीओची महाराष्ट्रात चर्चा रंगली आहे.
Edited By - Satish Daud
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.