Navi Mumbai Crime
Navi Mumbai CrimeSaam tv

Navi Mumbai Crime : विक्रीसाठी आणलेल्या १२ लाखाच्या कुत्र्याचा मृत्यू; नुकसान भरून काढण्यासाठी भावाच्या घरात चोरी

Navi Mumbai News : नवी मुंबईतील रबाळे येथे रक्षाबंधनाला मंदिरात गेलेल्या रणजितसिंग राजपुरोहित यांच्या घरी चोरीची घटना घडली होती
Published on

सिद्धेश म्हात्रे

नवी मुंबई : नवी मुंबईच्या रबाळे येथे चोरी झाल्याची घटना घडली होती. या घटनेचा तपास केल्यानंतर विक्रीसाठी चायनावरून आणलेल्या १२ लाखांचा श्वान मृत्यूमुखी पडल्याने झालेले नुकसान भरून काढण्यासाठी चुलत भावानेच घरी चोरी केल्याचे उघडकीस आले आहे. 

Navi Mumbai Crime
Sambhajinagar Crime : अल्पवयीन विद्यार्थिनीसमोर अश्लील कृत्य; रिक्षा चालक पोलिसांच्या ताब्यात

नवी मुंबईतील (Navi Mumbai) रबाळे येथे रक्षाबंधनाला मंदिरात गेलेल्या रणजितसिंग राजपुरोहित यांच्या घरी चोरीची घटना घडली होती. यामध्ये चोरट्याने ३७ तोळे सोनं, दीड किलो चांदी आणि साडेसात लाख रोख रकमेची चोरी केली होती. दरम्यान श्वान आणि मांजर इम्पोर्ट करुन त्याची विक्री करण्याचा व्यवसाय करणाऱ्या आरोपीने चायनावरून १२ लाखा रुपयांचा श्वान मागवीला होता. मात्र तो श्वान मृत्यूमुखी पडल्याने व्यवसायात मोठं नुकसान झाल्याने आरोपीने आपल्याच चुलत भावाच्या घरी चोरी केल्याचे समोर आले आहे. 

Navi Mumbai Crime
Mung Price : सोयाबीन पाठोपाठ मुगाचे भावही कोसळले; मुगाला केवळ साडेसात हजाराचा भाव

स्कुटीच्या आधारे लावला शोध 

दरम्यान घटना समोर आल्यानंतर रबाळे पोलिसांनी (Police) तपस सुरु केला. यात एका स्कूटीच्या आधारे आरोपी करण राजपुरोहित याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून आरोपीला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीसांनी चोरी केलेला ३४ लाख ८४ हजार किंमतीचा सर्व मुद्देमाल जप्त केला असून आरोपीची अधिक चौकशी करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com