Mung Price : सोयाबीन पाठोपाठ मुगाचे भावही कोसळले; मुगाला केवळ साडेसात हजाराचा भाव

Jalgaon News : जळगाव जिल्ह्यात यंदा मान्सूनचे आगमन वेळेत झाल्याने मुगाची पेरणी मोठ्या प्रमाणात करण्यात आली होती.
Mung Price
Mung PriceSaam tv
Published On

जळगाव : यंदा जळगाव जिल्ह्यात मुगाची लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली होती. शिवाय मुगाला मुबलक असा पाऊस झाल्याने चांगले उत्पादन येऊन दर देखील चांगला मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र आवक सुरु झाल्यानंतर लागलीच दरात घसरण झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. अर्थात सोयाबीनचे दर घसरल्यानंतर मुगाचे भाव देखील घसरले आहेत. 

Mung Price
Soyabean Price : सोयाबीनची आवक घटताच दर वाढले; वाशीम जिल्ह्यात हमीभावापेक्षा दर कमीच

जळगाव (Jalgaon) जिल्ह्यात यंदा मान्सूनचे आगमन वेळेत झाल्याने मुगाची पेरणी मोठ्या प्रमाणात करण्यात आली होती. त्यामुळे बाजार समितीत आवकही मुबलक होईल; अशी शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तविली होती. दरम्यान मध्यंतरी सुरु असलेल्या सततच्या पावसामुळे मुगाचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. परंतु अनेक शेतकऱ्यांनी (Farmer) दोन दिवस पाऊस बंद होताच मूग काढणीचे काम केले होते. यामुळे चांगला मूग आला आहे. त्यानुसार येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत नव्या मूगाची चांगली आवक सुरू झाली आहे. 

Mung Price
Sambhajinagar Crime : अल्पवयीन विद्यार्थिनीसमोर अश्लील कृत्य; रिक्षा चालक पोलिसांच्या ताब्यात

हमीभावापेक्षा कमी दर 

मात्र बाजार समितीत (Bajar Samiti) मुगाची आवक होताच सोयाबीन पाठोपाठ मुगाचेही भाव कोसळले आहेत. मूगाची आवक सुरू हमीभावापेक्षा कमी भाव सध्या जळगाव बाजार समितीत मुगाची मोठी आवक सुरू आहे. मुगाला हमीभाव ८ हजार ५५८ रुपये असताना सध्या चांगल्या दर्जाच्या मूगाला साडेसात तर साधारण गुणवत्तेच्या मूगाला साडेसहा हजारापर्यंत भाव मिळताना दिसत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com