Soyabean Price : सोयाबीनची आवक घटताच दर वाढले; वाशीम जिल्ह्यात हमीभावापेक्षा दर कमीच

Washim News : सोयाबीनला यंदा अपेक्षित असा दर मिळाला नाही. चांगला दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीन घरामध्येच साठवून ठेवला होता.
Soyabean Price
Soyabean PriceSaam tv
Published On

मनोज जयस्वाल 
वाशीम
: वाशीम जिल्ह्यात यंदाच्या हंगामातील सोयाबीन बाजारात दाखल होण्यास अद्याप दीड महिन्याच्या वेळ आहे. अशात वाशिम जिल्ह्यातील बाजार समित्यांत जुन्या सोयाबीनची आवक घटली आहे. यानंतर दरवाढ झाली आहे. असे असले तरी सरकारने ठरवून दिलेल्या हमीभावापेक्षा कमीच दर सोयाबीनला मिळत आहे.  

Soyabean Price
Shahapur Accident : टेम्पोच्या धडकेत दूध विक्रेत्याचा मृत्यू; शहापूर तालुक्यातील घटना

सोयाबीनला (Soyabean Price) यंदा अपेक्षित असा दर मिळाला नाही. चांगला दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीन घरामध्येच साठवून ठेवला होता. विशेष म्हणजे ठरवून दिलेल्या हमीभावापेक्षा कमी भाव मिळत होता. मात्र पेरणीच्या वेळी पैशांची गरज असल्याने काही शेतकऱ्यांनी मिळेल त्या दरात सोयाबीन विक्रीसाठी काढला होता. तर काहींनी अद्यापही विक्री केलेली नाही. दरम्यान आता सोयाबीनची आवक कमी झाल्याने दारात थोड्याफार प्रमाणात वाढ झाली आहे.  

Soyabean Price
Cotton Crop : कपाशीवर मर रोगाचा प्रादुर्भाव; उभी झाडे सुकू लागल्याने शेतकरी चिंतेत

बाजार समित्यांत (Bajar Samiti) सोयाबीनची आवक घटत असल्याने दरात वाढ होत असली तरी हमीभावापेक्षा कमीच दर मिळत आहे. यामुळे शेतकरी चिंतेत आहे. (Washim) वाशिम जिल्ह्यातील बाजार समित्यांत सोयाबीनचे उच्चांकी दर ४ हजार ४५५ रुपये प्रती क्विंटलच्या जवळपास पोहोचले होते. यात वाशीम बाजार समितीत ४ हजार ४१५ रुपये, कारंजात ४ हजार ४०० रुपये, मंगरूळपीर ४ हजार ४५५ रुपये तर मानोरा बाजार समितीमध्ये ४ हजार ४०० प्रती क्विंटलच्या जवळपास पोहोचले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com