Nashik Breaking: कामचुकारपणा भोवला; जिल्हा परिषदेतील ८ कर्मचाऱ्यांचे एकाचवेळी निलंबन, नाशिकमध्ये खळबळ

Nashik Zilla Parishad 8 Employees Suspended: नाशिकमध्ये एकाच वेळी जिल्हा परिषदेचे ८ कर्मचारी निलंबित करण्यात आले आहेत. कामचुकारपणामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
जिल्हा परिषदेचे ८ कर्मचारी निलंबित
Nashik Zilla Parishad Employees SuspendedSaam Tv
Published On

अभिजीत सोनवणे, साम टीव्ही नाशिक

नाशिकमध्ये जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांना कामचुकारपणा चांगलाच भोवला आहे. कारण नाशिक जिल्हा परिषदेच्या आठ कर्मचाऱ्यांचं एकाचवेळी निलंबन करण्यात आलं आहे. एकाच वेळी आठ कर्मचाऱ्यांच्या निलंबनामुळे नाशिक जिल्हा परिषदेत मोठी खळबळ उडाली आहे. कामचुकारपणाचा ठपका ठेवत या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळतेय.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी या कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश दिले (Nashik Zilla Parishad Employees Suspended) होते. कारवाई करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये ग्रामपंचायत विभागातील २, शिक्षण विभागातील ३, बांधकाम विभागातील २ तर आरोग्य विभागातील एका कर्मचाऱ्याचा समावेश आहे. कर्मचाऱ्यांच्या निलंबनामुळे जिल्हा परिषदेतील कामचुकार कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले (Nashik Breaking) आहेत. आता या कारवाईमुळे नाशिक जिल्हा परिषदेतील इतर कर्मचाऱ्यांना चांगलाच वचक बसणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे (Nashik Zilla Parishad) की, या कर्मचाऱ्यांसंदर्भात हाणामारी, लाचखोरी, कामात दिरंगाई, कामाविषयी वारंवार तक्रारी केल्या जात होत्या. तसंच कामाच्या वेळी गैरहजर राहिल्याप्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी ही कारवाई केली आहे. कामचुकारपणामुळे या कर्मचाऱ्यांचं निलंबन करण्यात आलं आहे. एकाच वेळी जिल्हापरिषदेच्या ८ कर्मचाऱ्यांच्या निलंबनामुळे कामचुकार कर्मचाऱ्यांना चांगलाच घाम फुटला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी अधिकाऱ्यांच्या या निर्णयामुळे जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांची चांगलीच धांदल उडाली आहे.

जिल्हा परिषदेचे ८ कर्मचारी निलंबित
Nashik News: मनसेच्या मिसळ पार्टीला नाराजीची फोडणी! २०० हून अधिक कार्यकर्त्यांनी मांडली खदखद; तक्रारींचा पेनड्राईव्ह राज ठाकरेंकडे देणार

छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील दोन पोलीस अधिकाऱ्यांवर एसीबीने कारवाई केली (Nashik News) आहे. वाळू वाहतूकदाराकडून लाच घेतल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. गंगापूर पोलीस उपविभागीय कार्यालयात दोघेही पोलीस हवालदार कार्यरत होते. दोन पोलीस कर्मचारी आणि एका खाजगी व्यक्तीसह तिघांविरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हा परिषदेचे ८ कर्मचारी निलंबित
Nashik Crime : बर्थडे पार्टीचा आवाज कमी करायला सांगितलं; 3 ते ४ जणांकडून माजी नगरसेविकेच्या पतीवर जीवघेणा हल्ला

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com