Nashik Crime : बर्थडे पार्टीचा आवाज कमी करायला सांगितलं; 3 ते ४ जणांकडून माजी नगरसेविकेच्या पतीवर जीवघेणा हल्ला

Nashik Crime News in Marathi : नाशिकमध्ये शिंदे गटाच्या माजी नगरसेविकेच्या पतीवर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली. नाशिकरोड परिसरात हा प्रकार घडला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
 3 ते ४ जणांकडून माजी नगरसेविकेच्या पतीवर जीवघेणा हल्ला
Nashik Crime : Saam tv

नाशिक : नाशिक शहरातील माजी नगरसेविकेच्या पतीसह चौघांवर हल्ला झाल्याची घटना घडली. वाढदिवसाच्या कार्यक्रमाचा आवाज कमी करायला सांगितल्याने 3 ते ४ जणांनी माजी नगरसेविकेचा पती आणि तिघांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. सोमवारी मध्यरात्री ही धक्कादायक घटना घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

नाशिकरोडला वाढदिवसाच्या कार्यक्रमात गोंधळ करू नका सांगितल्याचा रागातून धारदार हत्याराने माजी नगरसेविकेच्या पतीसह चौघांवर हल्ला केल्याचा प्रकार घडला. सोमवारी मध्यरात्री तीन ते चार जणांनी माजी नगरसेविकेच्या पतीसह चौघांवर हा हल्ला केला आहे. हल्लेखोर दुचाकीवरून आले होते.

 3 ते ४ जणांकडून माजी नगरसेविकेच्या पतीवर जीवघेणा हल्ला
Mumbai Crime News: बायकोच्या मारहाणीत नवऱ्याचा मृत्यू, चेंबूरमधील घटना

वाढदिवसाच्या कार्यक्रमात आवाज आणि गोंधळ कमी करा सांगितल्याचा राग आल्याने हल्ला केल्याची माहिती मिळत आहे. या हल्ल्यात जखमी झालेले नितीन खर्जुल हे शिंदे गटाच्या माजी नगरसेविका जयश्री खर्जुल यांचे पती आहेत.

 3 ते ४ जणांकडून माजी नगरसेविकेच्या पतीवर जीवघेणा हल्ला
Vasai Crime News: बायकोसोबत फ्लर्ट करायचा; नवऱ्याला राग आला, मित्राला संपवलं!

नाशिकमध्ये चौघांवर धारदार शस्त्राने हल्ला

या हल्ल्यादरम्यान अन्य तीन जण हे थांबविण्यासाठी गेले, मात्र हल्लेखोरांनी त्यांच्यावरही हल्ला केला. त्यामुळे या हल्ल्यात माजी नगरसेविकेच्या पतीसह तिघेही जखमी झाले आहेत. या प्रकरणाचा तपास नाशिकरोड पोलीस करत आहे.

महावितरणच्या कर्मचाऱ्यास माराहण

छत्रपती संभाजीनगर शहरातील चिकलठाणा शाखा येथील महावितरण कार्यालयात वीज तंत्रज्ञ म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यास मारहाण झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी कामृद्दीन बागवान फत्ते मोहम्मद याच्या विरोधात एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील नारेगाव नाला डीपीचे फ्युज कसे गेले असे विचारणा करण्यासाठी बागवान तिथे गेला. त्यानंतर त्याने महावितरणच्या कर्मचाऱ्याला शिवीगाळ करून बाचाबाची केली. या वादानंतर त्याने मारहाण केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com