Nashik Simhastha Kumbh Mela: सिंहस्थ कुंभमेळ्याआधीच साधू-संतांचा नाराजीचा सूर; नेमकं काय झालं?

Kumbh Mela Nashik: कुंभमेळ्याच्या पुरवतयारीसाठी बैठकीचे आयोजन केले जात असून यामध्ये साधू संतांना बोलावले जात नसल्यामुळे साधू महंतांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे.
Nashik
Nashik news saam tv
Published On

अभिजीत सोनवणे, साम टीव्ही

प्रभू श्री रामाच्या पद स्पर्शाने पावन झालेले श्री क्षेत्र नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे भरणारा कुंभमेळा हा साधारणतः हा तेरा महीने कालावधीचा असतो. परंतु यावेळी सुमारे 71 वर्षांनी हा अभूतपूर्व योग येणार आहे. तो म्हणजे गुरु ग्रहाने सिंह राशीत प्रवेश केल्यानंतर तो दोनवेळा वक्री करणार आहे. त्यामुळे यंदाचा कुंभमेळा हा तब्बल अडीच वर्षे चालणार आहे.

Nashik
Nashik Crime : नाशिक पुन्हा हादरले; मध्यरात्रीच्या सुमारास इसमाची हत्या, एकजण ताब्यात

मात्र हा कुंभमेळा होण्यापूर्वी यंदा मोठ्या प्रमाणात नाराजीचा सुर उमटताना दिसत आहे. कुंभमेळ्याच्या बैठकींमध्ये साधू संतांना बोलावले जात नसल्याने साधू महंतांनी नाराजी व्यक्त केली आहे. तसेच आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तारखा अजूनही जाहीर झालेल्या नाहीत. यामुळे अखिल भारतीय आखाडा परिषदेसह विविध साधू महंतांमध्ये प्रशासना विरोधात तीव्र नाराजीचे वातावरण पसरले आहे.

Nashik
गर्दीचा ताण मिटणार! शिर्डी विमानतळावर दोन हेलिपॅड अन् ८ पार्किंग लॉट्स, नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय

याबाबत आखाडा परिषदेचे प्रवक्ते महंत भक्ती चरणदास साम टीव्हीशी संवाद साधताना म्हणाले, कुंभमेळा अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेला असताना देखील प्रशासनाकडून नियोजन आणि तयारीबाबत स्पष्टता नसल्याने चिंता व्यक्त होत आहे. कुंभमेळ्याच्या तयारीसाठी प्रशासनाच्या बैठका सुरू झाल्या असल्या तरी त्या बैठकीत काय निर्णय घेतले जात आहेत? शाही स्नानाच्या तारीखा, साधुग्रामचं स्थान, मठ-मंदिरांची व्यवस्था याबाबत कोणतीही ठोस माहिती दिली जात नसल्याने साधू महंत संतप्त झाले आहेत.

Nashik
Nashik Riots: नाशिक दंगल सुनियोजितच! जामिनासाठी आधीच केले होते बिझनेसमनचे अपहरण|VIDEO

तपोवन परिसरात साधुग्रामसाठी कायमस्वरूपी जमीन विकत घेण्याची मागणी देखील साधूंनी केली आहे. मात्र निर्णय घेताना अखाडा परिषद किंवा साधूंना विश्वासात न घेतल्याचा आरोप महंतांनी केला आहे.या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय आखाडा परिषदेने जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याची वेळ मागितली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत बैठक घेऊन शाही स्नानाच्या तारखा जाहीर करण्याची परिषदची भूमिका आहे.

आम्हाला विश्वासात घेतल्याशिवाय कुंभमेळा नियोजन योग्य होणार नाही. प्रशासनाने आमच्याशी चर्चा करून पुढील निर्णय घ्यावेत, अशी स्पष्ट मागणी अखाडा परिषदेचे प्रवक्ते महंत भक्ती चरणदास यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com