Nashik Kumbh Mela: सिंहस्थ कुंभमेळ्याआधी वादाची ठिणगी, नावावरून साधू-महंत आक्रमक; नेमका वाद काय?

Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी नावावरून वाद चांगलाच पेटला आहे. नाशिकच्या कुंभमेळ्याला नाशिक- त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा न म्हणता त्र्यंबकेश्वर-नाशिक कुंभमेळा म्हणावं अशी मागणी करण्यात आली आहे.
Nashik Kumbh Mela: सिंहस्थ कुंभमेळ्याआधी वादाची ठिणगी, नावावरून साधू-महंत आक्रमक; नेमका वाद काय?
Simhastha Kumbh MelaGoogle
Published On

अभिजित सोनावणे, नाशिक

नाशिकच्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याआधीच वादाची ठिणगी उडाली आहे. कुंभमेळ्याच्या नावावरून वादाला तोंड फुटलं आहे. नाशिकच्या कुंभमेळ्याला नाशिक- त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा न म्हणता त्र्यंबकेश्वर-नाशिक कुंभमेळा म्हणावं अशी मागणी केली जात आहे. त्र्यंबकेश्वरच्या साधू महंतांच्या आखाड्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली. मात्र या मागणीला नाशिकच्या साधू महंतांनी विरोध केला आहे.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नावावरून वाद पेटला आहे. नाव बदलण्यात यावे अशी मागणी त्र्यंबकेश्वरच्या साधू-महंतांनी केली पण नाशिकच्या साधू-महंतांनी याला विरोध केला आहे. पूर्वीपासून असलेलं नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा नावंच कायम ठेवण्यात यावे यासाठी नाशिकच्या आखाड्यांमधील साधू महंतांची मागणी केली आहे. नाशिकचे साधू महंतं आपली भूमिका मनपा आयुक्तांकडे मांडणार आहेत.

रविवारी त्र्यंबकेश्वरच्या साधूनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर आजच्या बैठकीला महत्व आले आहे. कुंभमेळा प्राधिकरणात साधू महंतांचा समावेश करण्याची देखील मागणी केली जात आहे. साधू महंतांच्या नाराजीनंतर आज प्रशासनाची साधू महंतांसोबत कुंभमेळा नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. नाशिक महापालिकेच्या आयुक्त मनीषा खत्री यांच्या उपस्थितीत साधू महंतांची कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी बैठक सुरू झाली आहे.

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनात आखाड्यांच्या साधू महंतांना सहभागी करून घेतलं जात नसल्याची साधू महंतांची नाराजी होती. अखेर आज नाशिकमधील साधू महंतांसोबत प्रशासनाकडून कुंभमेळ्याच्या नियोजनाची बैठक आयोजित केली आहे. बैठकीच्या माध्यमातून साधू महंतांची नाराजी दूर करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com