Nashik Police: नाशकात वाहन-दुकानांची तोडफोड करुन दहशत माजवणाऱ्या गुंडांची पोलिसांनी काढली धिंड

नवीन नाशिक शुभम पार्क परिसरात मधधुंद अवस्थेत वाहनांची तोडफोड करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केलेली आहे.
Nashik Police
Nashik PoliceSaam Tv
Published On

तबरेज शेख -

नाशिक: नाशिक सिडकोतील शुभम पार्क परिसरात मद्यधुंद अवस्थेत वाहनांची आणि दुकानाची तोडफोड करून दहशत निर्माण करणाऱ्या चार गुंडांची अंबड पोलिसांनी शुभम पार्क परिसरातून धिंड काढली (Nashik police gave lesson to goons who were terrorizing people by vandalizing vehicles and shops). 

Nashik Police
Nashik: प्रियकर दुसरीकडे लग्न जमू देत नव्हता म्हणून प्रेयसीनेच त्याला जिवंत जाळले!

नवीन नाशिक (Nashik) शुभम पार्क परिसरात मधधुंद अवस्थेत वाहनांची तोडफोड करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी अटक (Arrest) केलेली आहे. अटक केलेल्या आरोपीचे नाव वैभव रणजित लोखंडे (19), वैभव गजानन खिरकाडे अविनाश शिवाजी गायकवाड, केतन गणेश भावसार यांच्यायह एका अल्पवयीन मुलाने शुभम पार्क परिसरामध्ये कोयत्याच्या जोरावर धुमाकूळ घालत चार चाकी वाहनांच्या काचा फोडल्या होत्या.

तसेच, नगरसेविका छाया देवांग यांच्या दुकानाच्या बाहेर असलेल्या पाणीपुरीच्या गाडीच्या देखील काचा फोडल्या होत्या. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, यातील अल्पवयीन मुलाची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली.

यातील चार संशयितांची परिसरात दहशत कमी करण्यासाठी पोलिसांनी त्यांना शुभम पार्क आणि ज्या परिसरामध्ये त्यांनी गाड्यांची तोडफोड आणि दुकानांचे नुकसान केले होते. त्या परिसरातून फिरवत धिंड काढली होती.

Nashik Police
Nashik: Propose Day ला विद्यार्थ्यांचा राडा; कॉलेजमधील दोन ग्रुपमध्ये तुफान हाणामारी...(पहा व्हिडिओ)

एकूणच पोलिसांनी आता आरोपीच्या विरोधात मोका अंतर्गत कारवाईला सुरुवात केली आहे. जेणेकरुन इतर गुन्हेगारांवर त्यांचा वचक बसेल.

Edited By - Nupur Uppal

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com