नाशिक: विद्यार्थ्यांच्या (students) दोन गटात तुफान हाणामारी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नाशिक (Nashik) जिल्ह्यात कॉलेज (College) कॅम्पसमध्ये ही घटना घडली आहे. सध्या सगळीकडे व्हॅलेंटाईन डे (Valentine's day) साजरे होत आहेत. अशात प्रपोज डे (Propose day) दिवस साजरा होत असताना ही हाणामारी झाली आहे. विद्यार्थ्यांच्या दोन गटामध्ये काही कारणावरून वाद झाला आहे. भांडणाचे रूपांतर फ्री स्टाईल हणामारीत झाले आहे. (Storm fighting between two groups in college)
पहा व्हिडिओ-
नाशिक (Nashik) जिल्ह्यातील निफाड गावात (village) कॉलेज कॅम्पसमध्ये दोन गटात चांगलीच हाणामारी झाली आहे. यामध्ये काही विद्यार्थी अक्षरशः तुडव- तुडव हाणामारी करतांना दिसत आहेत. या घटनेचा व्हिडिओ काही लोकांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर देखील शेअर केला आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मात्र, कॉलेजमध्येच तरुणांच्या मारामारीमुळे कॉलेजच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. सध्या व्हॅलेंटाइन डेच्या पार्श्वभूमीवर तरुणांमध्ये विविध ‘डे’ साजरे केले जात आहेत.
मंगळवारी प्रपोज डेच्या दिवशी विद्यार्थ्यांच्या दोन गटात काही कारणावर चांगलेच वाद झाले होते. त्याच वादाचे रुपांतर हाणामारीत झाले आहे. नाशिक जिल्ह्यात निफाड गावातील महाविद्यालय परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. कॉलेजमध्ये अनेकदा अशी छोटी- मोठी मारामारी होत असते. नाशिकमध्ये विद्यार्थ्यांच्या भांडणाचा व्हिडिओ समोर येण्याची ही पहिली वेळ नाही. सुरुवातीच्या वादावर दोन्ही गटांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली होती.
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.