Nashik News: पर्यटनस्थळांवर मद्यपींचा धिंगाणा, हुल्लडबाज पर्यटकांचा हैदोस; नाशिकमध्ये प्रशासनाचे आदेश धाब्यावर, VIDEO

Nashik News Tourists Issues At Bhavale And Pahine Waterfalls: नाशिकमध्ये मद्यपींचा पर्यटनस्थळांवर धिंगाणा पाहायला मिळतोय. प्रशासनाचे प्रतिबंधात्मक आदेश डावलल्याचं चित्र नाशिकमध्ये काल पाहायला मिळालं.
पर्यटनस्थळांवर मद्यपींचा धिंगाणा
Nashik NewsSaam Tv
Published On

अभिजीत सोनवणे, साम टीव्ही नाशिक

नाशिकमधील पर्यटनस्थळांवर धक्कादायक प्रकार समोर आलाय. हूल्लडबाज पर्यटकांचा हैदोस काल धबधब्यांवर नाशिक जिल्ह्यात पाहायला मिळाला. रविवारच्या सुट्टीत पर्यटकांची धबधब्यांच्या ठिकाणी मोठी गर्दी होतेय. तर मद्यपींचा पर्यटनस्थळांवर धिंगाणा दिसून येतोय. प्रशासनांकडून घालून देण्यात आलेले प्रतिबंधात्मक आदेश धाब्यावर बसवल्याचा प्रकार नाशिक जिल्ह्यात घडला आहे.

जीव धोक्यात घालत पावसाळी पर्यटन

नाशिकच्या भावली आणि पहिने परिसरामध्ये मद्यपी पर्यटकांनी गोंधळ (Nashik News) घातला. धबधब्यांखाली जीव धोक्यात घालत पावसाळी पर्यटन सुरू असल्याचं समोर आलंय. उंच टेकड्यांवरून धबधब्यांच्या ठिकाणी खाली उतरत जीव धोक्यात घालणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे. अनेक पर्यटनस्थळांवर दुर्घटना झाल्याचं समोर आलंय, तरीही पर्यटकांचा उत्साह कमी होत नसल्याचं चित्र आहे.

धबधब्यांवर पर्यटकांची हुल्लडबाजी

धबधब्यांखाली आणि धोकादायक ठिकाणी हुल्लडबाजी करतानाचे पर्यटकांचे अनेक व्हिडिओ समोर (Tourists At Bhavale And Pahine Waterfalls) आलेत. पहिने परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात धबधबे आहेत. मात्र, आता तितक्याच मोठ्या प्रमाणात दारूचे अड्डे देखील दिसून येत आहे. दारुड्या हुल्लडबाज लोकांमुळे सामान्य पर्यटकांना मनस्ताप होत असल्याचं समोर आलंय.

पर्यटनस्थळांवर मद्यपींचा धिंगाणा
Bhagirath Waterfall: हिरवी झाडी अन् घनदाट जंगल; अंबरनाथमधील हा धबधबा पाहून नक्कीच भेट द्याल

इगतपुरी तालुक्यातील घटना

यापूर्वी नाशिकच्या इगतपुरी तालुक्यात भावली धरण परिसरात पर्यटकांची हुल्लडबाजी समोर आली (Nashik Tourism) होती. जीव धोक्यात घालून धबधब्यावर जाण्यासाठी निसरड्या पायवाटेवर पर्यटकांची गर्दी पाहायला मिळाली होती. नाशिक जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांच्या प्रतिबंधित आदेशाला केराची टोपली नाशिक जिल्ह्यात दाखवली (Nashik Waterfall) जातेय. लोणावळ्याच्या घटनेवरून पर्यटक आणि प्रशासन कोणताही बोध घेताना दिसत नाहीये. आता तर धबधब्यांवर मद्यपी पर्यटकांचा राडा पाहायला मिळतोय.

पर्यटनस्थळांवर मद्यपींचा धिंगाणा
Kolhapur Paleshwar Waterfall: पालेश्वर धबधब्याचे मंत्रमुग्ध करणारे दृश्य ड्रोन कॅमेरात कैद, पाहा व्हिडीओ

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com