Nashik News : नांदूरमध्यमेश्वर धरणावर जीव धोक्यात घालून पर्यटन; पुलावर उभे राहून काढताय सेल्फी

Nashik News : केवळ तरुणच नाही तर काही महिला देखील आपल्या लहान मुलांना घेऊन या पुलावर फोटो काढताना दिसत आहेत
Nashik News
Nashik NewsSaam tv
Published On

नाशिक : नाशिकच्या नांदूरमध्यमेश्वर धरणामधून जायकवाडीच्या दिशेने तब्बल १५ हजार क्युसेक इतक्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग (Godavari River) गोदावरी नदीतून केला जात आहे. धरणातून पाणी सोडल्याने हे दृश्य (Nashik) पाहण्यासाठी नागरिक येथे गर्दी करत आहेत. अगदी लहान मुलांना घेऊन नागरिक धरणावर जीव धोक्यात घालून पर्यटनाला जात आहेत. (Tajya Batmya)

Nashik News
Satara News : धनगर आरक्षणासाठी खंडाळा तालुक्यात बंदची हाक; बहुतांश गावात कडकडीत बंद

नाशिकच्या नांदूर मध्यमेश्वर धरणाचे चार दरवाजे उघडल्यानंतर यातून १५ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. यामुळे गोदावरी नदीने रौद्ररूप धारण केल आहे. मात्र तरीही या परिसरातील पर्यटक आणि नागरिक आपला जीव धोक्यात घालून नांदूरमध्यमेश्वर धरणाच्या समोर असलेल्या पुलावर उभे राहून (Jayakwadi Dam) सेल्फी काढत आहेत. केवळ तरुणच नाही तर काही महिला देखील आपल्या लहान मुलांना घेऊन या पुलावर फोटो काढताना दिसत आहेत. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Nashik News
Nandurbar News : काढणीला आलेल्या भात पिकाच्या शेतात पाणीच पाणी; अवकाळी पावसामुळे फटका

पाण्याचा प्रचंड वेग आणि पुलावर आढळणाऱ्या पाण्याचा लाटा यामुळे पुलावर उभे राहून सेल्फी घेणे फोटो काढणं धोकादायक असलं, तरी नागरिक मात्र आपला जीव धोक्यात घालताना दिसत आहे. तर या नागरिकांना थांबवण्याची जबाबदारी असलेल्या पोलीस प्रशासन आणि जलसंपदा विभागाचे कर्मचारी या परिसरात नसल्याने नागरिकांची हुल्लडबाजी जिवावर बेतणारी आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com