ओंकार कदम
सातारा : आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक झाला आहे. जालन्यात बेमुदत उपोषण सुरु आहे. सरकारकडून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. (Satara) यामुळे समाजातंफ्रे आज खंडाळा (Khandala) तालुका बंदची हाक दिली होती. खंडाळा तालुका बंदला खंडाळावासीयांनी उत्फुर्त प्रतिसाद दिला असून अनेक गावात कडकडीत बंद पुकारण्यात आला आहे. (Maharashtra News)
मराठा समाजाकडून आरक्षणाच्या मागणीनंतर (Dhangar Reservation) धनगर समाज देखील आरक्षणासाठी आक्रमक झाला आहे. मोर्चा, उपोषण करत एसटी प्रवर्गात समजलं आरक्षण मिळावे अशी मागणी केली जात आहे. लोणंद येथील नगरपंचायत पटांगणावर धनगर समाज एस.टी आरक्षण शिफारशी करिता गेल्या बारा दिवसापासून गणेश केसकर बेमुदत उपोषणाला बसले आहेत. या आंदोलनाची दखल शासन स्तरावर घेत नसल्यान धनगर समाजाने खंडाळा तालुका बंदची हाक दिली दिली होती.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
गावांमध्ये शुकशुकाट
समाजाकडून पुकारण्यात आलेल्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळाले. आज बाराव्या दिवशीही गणेश केसकर यांनी उपोषण सुरूच ठेवले होते. दरम्यान आज सकाळपासूनच खंडाळा तालुक्यातील बहुतांश गावातील दुकाने बंद ठेवण्यात आली होती. यामुळे गावांमध्ये शुकशुकाट पाहण्यास मिळत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.