Parbhani News : गोदावरी नदी पात्रातील तराफे जाळले; वाळू माफियांविरोधात प्रशासनाची कारवाई

Parbhani News : रात्रीच्या वेळी ट्रॅक्टर व हायवाच्या साह्याने व गाढवावरून वाहतूक होते. गंगाखेड तालुक्यासह परजिल्ह्यात वाळूचा प्रति ब्रास आठ हजार रुपयांनी पुरवठा केला
Parbhani News
Parbhani NewsSaam tv

परभणी : गंगाखेड तालुक्यातील वाळू घाटांचे लिलाव झाले नाहीत. यामुळे नदीतून चोरट्या पद्धतीने वाळूची वाहतूक केली जात (Parbhani) आहे. वाळू माफियांनी गोदावरी नदी (Godavari River) पात्राची अक्षरशः चाळणी केली आहे. या सर्व गोष्टींकडे महसूल प्रशासन केवळ बघायची भूमिका घेत आहे. महसूल प्रशासनाच्या अर्थपूर्ण दुर्लक्षामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे. मात्र वाळू उपसा करत असलेल्या माफियांचे तराफे प्रशासनाने जाळून टाकले. (Breaking Marathi News)

Parbhani News
Hingoli Zilha Parishad: हिंगोली जिल्हा परिषद इमारतीला आग; भडका उडाल्याने कर्मचाऱ्यांची पळापळ

परभणी शहरासह ग्रामीण भागत व परजिल्ह्यात बांधकामांची वाढती संख्या लक्षात घेता गोदावरी नदी पात्रातील वाळूला मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. याचा फायदा वाळू माफिया घेत असून दिवस रात्र वाळूचा उपसा सुरू ठेवला आहे. परंतु दुसलगावच्या पोलीस पाटील संगीता कचरे या एकट्याच गोदापात्रात उतरून वाळू उपसा करणाऱ्यांना पोबारा करण्यास भाग पाडले. दिवस रात्र वाळूचा उपसा करून गाढवाच्या व बैलगाडीच्या साह्याने गोदावरी नदी पात्रालगत वाळूचा साठा केला जातो. रात्रीच्या वेळी ट्रॅक्टर व हायवाच्या साह्याने व गाढवावरून वाहतूक होते. गंगाखेड तालुक्यासह परजिल्ह्यात वाळूचा प्रति ब्रास आठ हजार रुपयांनी पुरवठा केला जातो. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Parbhani News
Dhangar Reservation : धुळे -सोलापूर महामार्गांवर धनगर समाजाकडून रस्ता रोको; आरक्षणाच्या मागणीसाठी जोरदार घोषणाबाजी

सोमवारी दुसलगाव शिवारात वाळू उपसा होत असल्याचे कळताच त्यांनी महसूल प्रशासनाला कल्पना दिली. महसूल प्रशासनाच्या खबऱ्यांमार्फत सदरील माहिती वाळू माफियांना कळाल्यानंतर महसूल प्रशासनाचे पथक येण्यापूर्वीच वाळू उपसा करणाऱ्यांनी घटनास्थळावरन पोबारा केला. त्यानंतर नदीपात्रातील तराफे महसूल प्रशासनाच्यावतीने जाळण्यात आले. महसूल प्रशासनाच्यावतीने ठोस भूमिका घेण्यात नसल्यामुळे नागरिकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com