Nashik: वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून चोरटे पोबारा; घटना सीसीटीव्हीत कैद

ही संपूर्ण घटना येथील एका दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
Crime News
Crime NewsSaam tv
Published On: 

नाशिक - नाशिकच्या (Nashik) कॉलेज रोडवरील येवलेकर मळा विसेमळा रस्त्यावर एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून पोबारा केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही झाली आहे. सोमवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास संध्या अंकलगी या पायी जात होत्या. यावेळी त्यांच्यासमोरून काळ्या रंगाच्या दुचाकीने दोघे संशयित तरुण आले. त्यांनी अंकलगी यांच्या उजव्या बाजूने दुचाकी घेऊन काही सेकंद थांबले आणि पाठीमागे बसलेल्या संशयित चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सुमारे ४ तोळे वजनाचे मंगळसूत्र हिसकावून पोबारा झाले.

दुचाकीचालकाने डोक्यात हेल्मेट परिधान केलेले होते. त्याच्या पाठीमागे बसलेल्या युवकाने डोक्यात टोपी घातलेली व गळ्यात लहान बॅग अडकविलेली होती. ही संपूर्ण घटना येथील एका दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

हे देखील पाहा -

सोनसाखळी हिसकावल्याचे लक्षात येताच अंकलगी यांनी आरडाओरड केली व त्यांच्या पाठीमागे धाव घेतली. यावेळी रस्त्याने जाणाऱ्या दोन तरुणांच्याही हा प्रकार लक्षात आला. त्यांनी त्वरित दुचाकीने पाठलाग केला मात्र दोघे सोनसाखळी चोर बॉईज टाऊन शाळेपासून नेमके कुठे गेले, याचा शोध लागू शाळा नाही.

Crime News
Maharashtra Political Crisis: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर निर्णय नाहीच; पुढील सुनावणी आता 'या' तारखेला

दरम्यान याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेशोत्सवात शहरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात असून, गस्त देखील वाढविण्यात आली आहे. तरीही सोनसाखळी चोर सर्रासपणे वृद्ध महिलांना वेगवेगळ्या भागात लक्ष्य करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.