Nashik Swine Flu: चिंताजनक! नाशिकमध्ये स्वाईन फ्ल्यूचं थैमान, आतापर्यंत १० जणांचा मृत्यू

Swine Flu Entered in Maharshtra's Nashik Area: नाशिक जिल्ह्यामध्ये आतापर्यंत १० जणांचा स्वाईन फ्ल्यूमुळे मृत्यू झाल्यामुळे चिंता वाढली आहे. नागरिकांना काळजी घ्यावी आणि सतर्क राहावे असे आवाहन केले जात आहे.
Nashik Swine Flu: चिंताजनक! नाशिकमध्ये स्वाईन फ्ल्यूचं थैमान, आतापर्यंत १० जणांचा मृत्यू
Swine Flu In NashikSaam Tv
Published On

अभिजीत सोनवणे, नाशिक

नाशिकमध्ये स्वाईन फ्ल्यूचा (Nashik Swine Flu) धोका वाढत चालला आहे. नाशिकमध्ये स्वाईन फ्ल्यूमुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. हा नाशिक जिल्ह्यातील स्वाईन फ्ल्यूचा दहावा बळी आहे. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत १० जणांचा स्वाईन फ्ल्यूमुळे मृत्यू झाल्यामुळे चिंता वाढली आहे. अशामध्ये नागरिकांनी सतर्क राहावे आणि काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक जिल्ह्यात स्वाईन फ्ल्यूने थैमान घातलं आहे. वाईन फ्ल्यूचा जिल्ह्यात दहावा बळी गेला आहे. निफाडमधील एका ५८ वर्षांच्या व्यक्तीचा स्वाईन फ्ल्यूमुळे मृत्यू झाल्याचं समोर आले आहे. तर जिल्ह्यात स्वाईन फ्ल्यूचे आणखी ६ नवे रुग्ण आढळल्यानं आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.

नाशिक शहरातील स्वाईन फ्ल्यू बाधितांची संख्या ३५ तर ग्रामीण भागात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या २५ वर पोहचली आहे. स्वाईन फ्ल्यूची रुग्णसंख्या वाढत असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याच्या आणि लक्षणं आढळल्यास त्वरित वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून उपचार घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून केले जात आहे.

Nashik Swine Flu: चिंताजनक! नाशिकमध्ये स्वाईन फ्ल्यूचं थैमान, आतापर्यंत १० जणांचा मृत्यू
Pune Drug News : पुण्यातील अनधिकृत पब आणि बारवर पालिकेचा हातोडा, धडक कारवाई

उपचार घेत असलेल्या असलेल्या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर येत आहे. मोठ्या प्रमाणात स्वाईन फ्ल्यूचे रुग्ण आढळल्यानं आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. स्वाईन फ्ल्यू झालेल्या रुग्णांच्या संपर्कातील लोकांचे स्वॅब नमुने घेवून तपासणी करणार येणार आहे. नाशिकमध्ये डेंग्यूचा धोका कमी झाल्यानंतर आता स्वाईन फ्ल्यूचा धोका वाढल्याने आरोग्य यंत्रणेची देखील डोकेदुखी वाढली आहे. एप्रिल महिन्यापासूनच नाशिकमध्ये स्वाईन फ्ल्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे.

Nashik Swine Flu: चिंताजनक! नाशिकमध्ये स्वाईन फ्ल्यूचं थैमान, आतापर्यंत १० जणांचा मृत्यू
Swine Flu VIDEO: Nashik जिल्ह्यात स्वाईन फ्ल्यूचं थैमान! ५८ वर्षांच्या व्यक्तीचा मृत्यू

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com