Assembly Election: मित्रपक्षांच्या जागांवर शिंदे गटाचा डोळा; नाशिकमधील ५ मतदारसंघावर ठोकला दावा, महायुतीत जोरदार जुंपणार?

Crisis In Mahayuti Over Seat Distribution Formula:नाशिकमधील जागा वाटपांवरुन शिवसेना शंदे गट, भाजप आणी राष्ट्रवादी अजित पवार गट आमने सामने येण्याची शक्यता आहे. इगतपुरी, दिंडोरी, देवळालीसह नाशिक शहरातील २ जागांवर शिंदेसेनेने दावा केला आहे.
Assembly Election: महायुतीमधील संघर्ष संपेना... मित्रपक्षांच्या जागांवर शिंदेसेनेचा डोळा; नाशिकमधील ५ जागांवर ठोकला दावा
Ajit Pawar, Eknath Shinde Maharashtra PoliticsSaam TV
Published On

नाशिक, ता. १९ सप्टेंबर

Mahayuti Seat Distribution Formula: अवघ्या काही दिवसांमध्ये विधानसभेच्या रणसंग्रामाचे बिगुल वाजणार असून त्याआधी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विधानसभेच्या जागा वाटपाबाबत महायुतीमधील घटक पक्षांमध्ये सध्या जोर बैठका सुरु आहेत. अशातच नाशिक जिल्ह्यातील विधानसभेच्या ५ जागांवर शिवसेना शिंदे गटाने दावा ठोकल्याने महायुतीमध्ये नवा वाद उभा राहण्याची शक्यता आहे. शिंदे गटाचे नाशिक जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

महायुतीत मिठाचा खडा?

सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत नाशिकमधील जागा वाटपावरुन महायुतीत मोठा संघर्ष पाहायला मिळत होता. नाशिक लोकसभेवर शिवसेना शिंदे गट तसेच भारतीय जनता पक्षाने दावा केल्याने हा वाद पेटला होता. भाजप-सेनेच्या याद वादामुळे नाशिकमध्ये शिंदेंच्या विद्यमान खासदारांना पराभव स्विकारावा लागला. अशातच आता विधानसभेतही नाशिकमधील जागा वाटपांवरुन शिवसेना शंदे गट, भाजप आणी राष्ट्रवादी अजित पवार गट आमने सामने येण्याची शक्यता आहे.

पाच जागांवर शिंदे गटाचा दावा

समोर आलेल्या माहितीनुसार, नाशिकमधील इगतपुरी, दिंडोरी, देवळालीसह नाशिक शहरातील २ जागांवर शिंदे सेनेने दावा केला आहे. जिल्ह्यातील या ५ जागांवर शिंदेंची शिवसेना आग्रही असून सक्षम आणि निवडून येण्याची क्षमता असलेले उमेदवार असल्यानं या ५ जागा निश्चितच जिंकू, असा विश्वास जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनी व्यक्त केला आहे.

Assembly Election: महायुतीमधील संघर्ष संपेना... मित्रपक्षांच्या जागांवर शिंदेसेनेचा डोळा; नाशिकमधील ५ जागांवर ठोकला दावा
Maharashtra Politics: लोकसभेला फटका, विधानसभेला सावध पवित्रा! शिंदे गटाचा उत्तर भारतीयांवर डोळा; मतदारांना आकर्षित करण्यासाठी नवा प्लॅन

दरम्यान, शिंदेंची शिवसेना मागत असलेल्या जागांपैकी २ जागांवर सध्या राष्ट्रवादी अजित पवार, २ जागांवर भाजप आणि एका जागेवर काँग्रेसचा आमदार आहे. सध्या नाशिक जिल्ह्यात दादा भुसे आणि सुहास कांदे असे शिंदेंच्या शिवसेनेचे २ आमदार आहेत. अशातच शिंदेंच्या शिवसेनेने केलेल्या पाच जागांच्या मागणीवर आता राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजप काय भूमिका घेते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Assembly Election: महायुतीमधील संघर्ष संपेना... मित्रपक्षांच्या जागांवर शिंदेसेनेचा डोळा; नाशिकमधील ५ जागांवर ठोकला दावा
Wada Crime News : इंस्टाग्रामवरुन प्रेमाच्या जाळ्यात ओढले; मुलीला ब्लॅकमेल करणाऱ्या तरूणाला अटक

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com