Nashik News: आई- वडीलांना काम करावे लागतेय ही लाजीरवाणी गोष्‍ट..चिठ्ठी लिहत मेकॅनिकल इंजीनियरने संपविले जीवन

आई वडील काम करताय ही लाजीरवाणी गोष्‍ट..चिठ्ठी नोट लिहत मेकॅनिकल इंजीनियरने संपविले जीवन
Nashik News
Nashik NewsSaam tv
Published On

तबरेज शेख

नाशिक : हातात पक्की नोकरी नसल्याने तसेच कंपनीतून ब्रेक मिळाल्याच्या नैराश्यात २२ वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना (Nashik) नाशिकच्या काठे गल्ली परिसरात घडली आहे. रोहित संजय वाघ असं आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. मी लुझर आहे, मी असतांनाही आई वडीलांना काम करण्याची वेळ येते ही लाजिरवाणी गोष्ट आहे' अशी आत्महत्येपूर्वी चिठ्ठी त्याने लिहिली आहे. (Breaking Marathi News)

Nashik News
Jalna Bank Election: जिल्हा बँक निवडणुकीत १२ अर्ज अवैध; संतोष दानवे, राहुल लोणीकर बिनविरोध

नाशिक शहरातील काठेगल्ली परिसरात राहत्या घरी सिलिंगच्या हुकाला दोरीने गळफास घेत आत्महत्या केली. रोहित याने मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे घेतले शिक्षण घेतले होते. रोहित हा एका कंपनीमध्ये काम करत होता. मात्र त्याला कंपनीतून ब्रेक मिळाला व ती नोकरी सुटली. त्यानंतर पुन्हा एकदा तो नव्याने कामाच्या शोधात होता. त्याला जॉब मिळला. मात्र पगार अवघा १५ हजारच होता.

Nashik News
Mira Bhayander News: पैश्याची होळी करत सोडली पाण्यात; मीरा भाईंदर पालिकेविरुद्ध मनसेचे अनोखे आंदोलन

एवढ्याशा पगारांमध्ये काय होणार असा प्रश्न त्याच्यासमोर होता. पुन्हा शून्यापासून सुरुवात करावी लागेल असं त्याला वाटत होत. त्यामुळे आई-वडिलांची जबाबदारी कशी सांभाळावी असा प्रश्न त्याला पडत होता; असं त्याने सुसाईड नोटमध्ये लिहिल आहे. या सुसाईडमुळे पुन्हा एकदा बेरोजगारीचा प्रश्न समोर आला आहे. एवढे शिक्षण घेत असताना देखील रोहितला चांगले काम मिळणं कठीण झालं होतं. त्यामुळे त्याला आई-वडिलांची जबाबदारी कशी स्वीकारावी असा प्रश्न पडला होता. त्याच नैराश्यातून रोहितने आपलं जीवन संपवल. रोहितच्या आत्महत्येमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Nashik News
KDMC News: पाणी का तुंबले..आयुक्तांनी मागितला अहवाल; पावसात कल्याण डोंबिवली तुंबली

काय आहे सुसाईड नोटमध्‍ये

मम्मी, पप्पा आणि सार्थक

मी एक खुप मोठा LOSER आहे. मी कुठल्या तोंडाने तुम्हाला समजावू हे समजत नव्हते. मी डिप्‍लोमा केला. त्यानंतर डिग्री नाही केली. कारण सरकारी नोकरीची तयारी करायची होती. ती तयारी पूर्ण नाही केले व जॉबला लागलो. तीन वर्षे चांगल्या पद्धतीने जॉब केला. नंतर ४० हजार खर्च करून डिझाईनिंग इंजिनिअरचा कोर्स केला. त्यावर मला जॉब भेटला.१५ हजारचा. म्हणजे परत सर्व पहिल्यापासून सुरू. माझे वय २२ झाले आहे. यावेळी मी तुमची घराची जबाबदारी घ्यायला हवी, पण माझे काही वेगळेच चालू आहे. माझे खूप निर्णय चुकले. त्याचा परिणाम तुम्हाला भोगावा लागतो. मी २२ वर्षांचा झाला तरी तुम्हाला काम करायची वेळ येते. हे माझ्यासाठी खूप लाजिरवाने आहे. माझ्या फोनचा पासवर्ड ४४२१ आहे. काही लागल्यास माझ्या Urstox मध्ये ७० हजार फंड होता. तो बँकेत उद्या ३ वाजेपर्यंत विड्राॅवल होऊन जाईल. तो इन्‍व्‍हेस्‍टींगला वापरा. UPI Password 1820001 आहे. आता बस मी थांबतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com