
नाशिक शहरात नायलॉन मांजावर बंदी असताना देखील शहरात मांजाचा सर्रास वापर सुरू आहे. या नायलॉन मांजामुळे २५ वर्षीय तरुण मृत्यूच्या दारातून परत आला आहे. या नायलॉन मांजामुळे तरुणाच्या गळ्यावर तब्बल ७५ टाके पडले असून त्याच्यावर सध्या नाशिक शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा नायलॉन मांजा किती घातक आहे हे आपण पाहणार आहेत.
नाशिक शहरात नायलॉन मांजा विक्रीसाठी बंदी घातलेली असताना देखील सर्रासपणे विक्री आणि वापर सुरू असल्याच पाहायला मिळतंय. पोलिसांकडून मांजा विक्रेत्यांवर अक्षरशः तडीपारीपासून ते मोक्का लावण्यापर्यंत कारवाया सुरू आहेत. नाशिक शहरात दररोज मांजा विक्रेत्यांवर कारवाई केली जात आहे. मात्र तरी देखील नाशिक शहरात मांजाची सर्रासपणे विक्री सुरू असून वापरही तितक्याच प्रमाणात केला जातोय. याच घातक नायलॉन मांजामुळे नाशिक शहरातील वडाळा नाका परिसरात राहणाऱ्या २५ वर्षीय मुशरन सय्यदला गंभीर इजा झाली आहे.
मांजामुळे मुशरनचा गळा चिरला गेला आणि त्याच्या गळ्याला ७५ टाके पडले आहेत. त्याच्यावर नाशिकच्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून पशुपक्षांप्रमाणेच मानवासाठी देखील घातक असलेल्या या नायलॉन मांजामुळे हा २५ वर्षीय तरुण दैव बलवत्तर म्हणून मृत्यूच्या दारातून परत आला आहे. नायलॉन मांजाने गळ्यापासून ते आतमध्ये असलेल्या मुख्य रक्तस्त्राव करणाऱ्या वाहिनीपर्यंत चिरले गेले तातडीने रुग्णालयात दाखल केल्याने या तरुणाला नवं आयुष्य मिळालंय.
नाशिक शहरासह जिल्हाभरात तब्बल १६ घटना घडल्या असून यामध्ये अनेकांना गंभीर स्वरूपाच्या इजा झाल्या आहेत. या नायलॉन मांजामुळे फक्त मानवासच नव्हे तर पशुपक्ष्यांना देखील इजा होत असून यात अनेक पशुपक्षी देखील मृत्युमुखी पडले आहेत. त्यामुळे या नायलॉन मांजासंदर्भात अजून कठोर पावले उचलावीत अशी मागणी होऊ लागली आहे.
दरम्यान, नाशिक शहरातील एका कपड्याच्या दुकानात काम करणारा मुशरन सय्यद हा तरुण दुचाकीवरून घरी येत असताना त्याच्या गळ्याला नायलॉन मांजा अडकला आणि तिथेच चिरला गेल्याने रक्त भांबाळ होत रस्त्यावरच कोसळला त्याच अवस्थेत नागरिकांनी त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र त्या ठिकाणी काही अडचणींमुळे उपचार न होऊ शकल्याने त्याला आणखी एका दुसऱ्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या ठिकाणी त्याच्यावर अवघ्या १० ते १५ मिनिटात शस्त्रक्रिया करून त्याला नवीन जीवदान देण्यात आले आहे. या जखमी तरुणाच्या आईने देखील याप्रकरणी कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
नायलॉन मांजाने पतंगबाजीचा आनंद घेण्याच्या उत्साहात अनेक जण जखमी होत आहेत. त्यामुळे संक्रांतीला पतंगबाजी करताना नायलॉन मांजाचा वापर टाळून साध्या मांजाचा वापर करून अशा घटनांना आपण रोखू शकतो. नायलॉन मांजाच्या वापरासंदर्भात मोठ्या प्रमाणात जनजागृती होत असली तरी देखील नायलॉन मांजाचा वापर पूर्णपणे रोखण्यात अद्यापही यश आलेले नाही. त्यामुळे नायलॉन मांजाबाबत आणखी प्रभावीपणे प्रबोधन होण्याची गरज आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.