Nashik Civil Hospital : धक्कादायक! नाशिक जिल्हा रुग्णालयात मुलीवर सुरु होते उपचार; आईने अचानक संपवलं जीवन

Nashik News : रविवारी सुटी असल्याचे जिल्हा रुग्णालयात नेहमीप्रमाणे वर्दळ कमी होती. दुपारी दोन वाजेदरम्यान निर्मनुष्य ठिकाण असलेल्या आरोग्य अभियानाच्या कार्यालयासमोर महिलेने गळफास घेतल्याचे समोर आले
Nashik Civil Hospital
Nashik Civil HospitalSaam tv
Published On

तबरेज शेख 
नाशिक
: जिल्हा रुग्णालयातून बाळ चोरीची घटना ताजी असतांना आज एका महिलेने जिल्हा रुग्णालयाच्या आवारात गळफास घेत आत्महत्या घटना समोर आली आली आहे. रविवारी दुपारी दोन वाजेच्या दरम्यान ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे जिल्हा रुग्णालय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पंचनामा करत तपासाला सुरवात केली आहे. 

नाशिक शहरातील संत कंबीर नगरमधील रहिवासी कवित उमेश अहिवळे (वय २५) असे मृत महिलेचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मृत कविता हि भंगार गोळा करण्याचे काम करते. रविवारी सुटी असल्याचे जिल्हा रुग्णालयात नेहमीप्रमाणे वर्दळ कमी होती. दुपारी दोन वाजेदरम्यान निर्मनुष्य ठिकाण असलेल्या आरोग्य अभियानाच्या कार्यालयासमोरील झाडाझुडपामध्ये एका महिलेने गळफास घेतल्याचे समोर आले. ही बाब सुरक्षारक्षक, परिचारिका, डॉक्टरांना समजताच सर्वांनी घटनास्थळी धाव घेतली. 

Nashik Civil Hospital
Jalgaon : दुर्दैवी..पत्नी देखत पतीचा मृत्यू; नदीत बुडत असताना मदतीसाठी करत राहिली याचना

मुलगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल 

दरम्यान जिल्हा रुग्णालय पोलीस चौकीतील पोलिसांनी घटनास्थळी येत सरकारवाडा पोलिसांना एका महिलेने आत्महत्या केल्याची माहिती दिली. त्यानंतर सरकारवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी आले. पोलिसांकडून पंचनाम्याचे काम सुरु आहे. दरम्यान मृत महिलेला चार मुली असून यातील एका मुलीवर रुग्णालयात सुरु होते. तिची तिसरी मुलगी अशक्तपणामुळे आजारी असल्याने त्या मुलीवर जिल्हा रुग्णालयात कुपोषित विभागात उपचार सुरु होते. रविवारी सकाळी ती मुलीला घेऊन बाहेर गेली होती. ती दुपारी गळफास घेतलेल्या अवस्थेत रुग्णालयाच्या आवारात आढळून आली.

Nashik Civil Hospital
Sakri Police : घराबाहेर अवैध दारूचा साठा; साक्री पोलिसांची मोठी कारवाई, ७७ लाखाचा साठा जप्त

रुग्णालयातील सुरक्षिततेचा प्रश्न 

नाशिक जिल्हा रुग्णालयात महिलेने आत्महत्या केल्याच्या घटनेच्या प्रकाराने पुन्हा एकदा जिल्हा रुग्णालयाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. दरम्यान जिल्हा रुग्णालयातून बाळ अदलाबदल झाल्याची घटना यापूर्वी घडली होती. तर दोन दिवसांपूर्वी जिल्हा रुग्णालयातून बाळ चोरी गेल्याची घटना ताजी असतानाच रुग्णालय आवारात महिलेने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com