Jalgaon : दुर्दैवी..पत्नी देखत पतीचा मृत्यू; नदीत बुडत असताना मदतीसाठी करत राहिली याचना

Jalgaon News : पती बुडत असल्याचे पाहून पत्नी आशाबाई यांनी आरडाओरड केली. यावेळी परिसरातील ग्रामस्थ धावून आले. पांडुरंग मराठे यांना नदीपात्रातून काढून तत्काळ जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविले
Jalgaon News
Jalgaon NewsSaam tv
Published On

जळगाव : गिरणा नदीत मोठ्या प्रमाणात वाळूची चोरी सुरु असते. यामुळे नदीत मोठमोठे खड्डे झाले आहेत. या खड्ड्यात पडून एका इसमाचा मृत्यू झाल्याची घटना लमांजन शिवारात घडली आहे. सदरची घटना घडली त्यावेळी पत्नीदेखील सोबत होती. मात्र पतीला बुडत असल्याचे पाहत असताना मदतीसाठी आरडाओरड केली. मात्र मदतीसाठी कोणी नसल्याने महिला पतीला वाचवू शकली नाही. 

यावल शहरातील रहिवासी पांडुरंग नामदेव मराठे (वय ५९) असे मृताचे नाव आहे. मूळ यावल तालुक्यातील रहिवासी पांडुरंग मराठे हे पत्नी आशाबाई यांच्यासह वास्तव्यास होते. दरम्यान शनिवारी (४ डिसेंबर) पांडुरंग मराठे हे पत्नी आशाबाई यांना घेऊन एरंडोल तालुक्यात खर्ची येथे आले होते. तेथून लमांजन येथील नातेवाईक गोकूळ मराठे यांच्याकडे निघाले होते. दुपारी तीनच्या सुमारास गिरणा नदी पात्र ओलांडत असताना नदीत वाळू उपशामुळे पडलेल्या खड्ड्यांमध्ये ते पडले. खड्डा खोल असल्याने ते बुडायला लागले. 

Jalgaon News
Sakri Police : घराबाहेर अवैध दारूचा साठा; साक्री पोलिसांची मोठी कारवाई, ७७ लाखाचा साठा जप्त

पतीला वाचविण्यासाठी आरडाओरड 

पती बुडत असल्याचे पाहून पत्नी आशाबाई यांनी आरडाओरड केली. यावेळी परिसरातील ग्रामस्थ धावून आले. त्यांनी पांडुरंग मराठे यांना नदीपात्रातून काढून तत्काळ जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. यावेळी त्यांच्या पत्नीने मन हेलावणारा आक्रोश केला. घटनेची एमआयडीसी पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.

Jalgaon News
Orange Farm : संत्र्याचे उत्पादन घटले, बदलत्या वातावरणाचा परिणाम; आंतरपीक म्हणून टरबुजाची लागवड

दीड महिन्यापूर्वीच मुलाचा मृत्यू 

साधारण दीड महिन्यापूर्वी (२४ नोव्हेंबर) पांडुरंग मराठे यांचा मुलगा मनोज याचा जळगावात सेंट्रिंगचे काम करताना पडून मृत झाला होता. अवघ्या दीडच महिन्यापूर्वी मुलाचा मृत्यू झाला असताना आता पतीचा मृत्यू झाल्याने आशाबाई याना जबर मानसिक धक्का बसला आहे. पतीच्या मृत्यूनंतर त्यांनी रुग्णालयात एकच आक्रोश केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com