Nashik Breaking : दारू प्यायला वीस रुपये दिले नाही म्हणून गळा चिरून हत्या!
Nashik Breaking : दारू प्यायला वीस रुपये दिले नाही म्हणून गळा चिरून हत्या!Saam Tv

Nashik Breaking : दारू प्यायला वीस रुपये दिले नाही म्हणून गळा चिरून हत्या!

नाशिक मध्ये दारू प्यायला २० रुपये दिले नाही या अत्यंत क्षुल्लक कारणावरून एका बिगारी काम करणाऱ्या व्यक्तीची हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Published on

सागर गायकवाड

नाशिक : नाशिक मध्ये २० रुपयांच्या अत्यंत क्षुल्लक कारणावरून एका बिगारी काम करणाऱ्या व्यक्तीची हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जुना आडगाव नाक्यावरील रामरतन लॉज येथे दारू प्यायला २० रुपये दिले नाही म्हणून बिगारी काम करणाऱ्या सुनील नामक व्यक्तीची मारेकर्‍यांनी गळा चिरून रात्री हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

हत्या झालेला युवक हा जुना आडगाव नाका ते वाघाडी ते पुढे सेवा कुंज पर्यंत पळत पळत गेला आणि रस्त्यालगतच रक्ताच्या थारोळ्यात पडला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

हे देखील पहा :

सविस्तर घटना :

जुना आडगाव नाक्यावरील रामरतन लॉज येथे बस सुनील आणि त्याचे 3 मित्र हे गप्पा मारत बसले होते. अचानक गायकवाड नामक इसम तिथे आला त्याने सागर दादा नामक व्यक्ती ला दारू प्यायला २० रुपये मागितले. मात्र, तिथे असलेल्या सुनीलने मध्यस्थी करत पैसे मागणाऱ्या व्यक्तीला बोलला की तू कोण? तुला पैसे का देऊ? असे बोलल्यामुळे रागाला गेलेल्या गायकवाड आणि सुनीलमध्ये बाचाबाची झाली आणि गायकवाड याने खिशात असलेला धारदार चाकू बाहेर काढला आणि सुनील च्या गळ्यावर सपासप वार करून तेथून पसार झाला.

Nashik Breaking : दारू प्यायला वीस रुपये दिले नाही म्हणून गळा चिरून हत्या!
विजय वडेट्टीवारांवर पडळकर कडाडले; MPSC वरुन जोरदार टीका (VIDEO)

धारदार शस्त्राने वार झाले असतानासुद्धा सुनील 1 ते दीड किलोमीटर पळत होता. मात्र, अतिरक्तस्राव झाल्याने रस्त्यालागतच रक्ताच्या थारोळ्यात तो पडला! सदर युवकास उपचारासाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्या युवकाचा रुग्णालयात नेट असताना वाटेतच मृत्यू  झाला. मारेकऱ्याला पोलिसांनी पकडले असून पुढील तपास पंचवटी पोलीस करत आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com