Nashik News: एक CCTV शहरासाठी... वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी नाशिक पोलिसांची अभिनव संकल्पना; व्यापाऱ्यांकडून स्वागत

पोलिसांनी शहरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे गुन्हेगारीला आळा बसेल असा विश्वास नाशिककरांनी व्यक्त केला आहे.
Nashik News
Nashik NewsSaamtv
Published On: 

Nashik News: नाशिक शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी आता शहर पोलिसांनी नाशिककरांनाच एक पाऊल पुढे टाकण्याचे आवाहन केले आहे. एक कॅमेरा नाशिकसाठी ही संकल्पना पोलिसांनी सुरू करतात नाशिक मधील दोनशेहून अधिक व्यापाऱ्यांनी तब्बल दोन हजार कॅमेरे शहरात बसवत शहरातील मुख्य बाजार पेठा कॅमेऱ्याच्या नजरेखाली आणल्या आहेत. पोलिसांच्या या अभिनव संकल्पनेच नाशिककरांनीही स्वागत केला आहे.

Nashik News
Mumbai Political News : ठाकरे गटाला पुन्हा खिंडार पडणार? पक्षातील नव्या नियुक्त्यांवरुन पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी

याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिक शहरात दिवसाढवळ्या होणाऱ्या हाणामाऱ्या, बाजारपेठांमध्ये होणारी चैन-स्नेचींग, अशा घटना वाढत आहेत. यावर नाशिक पोलिसांनी शहर सुरक्षेसाठी एक सीसीटीव्ही कॅमेरा शहर सुरक्षेसाठी ही अभिनव संकल्पना पुढे आणली आहे.

नाशिक शहराचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी नाशिकच्या मुख्य बाजारपेठांमधील दुकानदारांना आपल्या दुकानाच्या आतमध्ये ज्या प्रकारे कॅमेरे आपण बसवतो त्यातीलच एक कॅमेरा बाजारपेठेच्या दिशेने लावावा असे आवाहन केले आहे. (Latest Marathi News)

Nashik News
Parbhani Crime News: परभणी हादरलं! लॉजवर नेऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार; परिसरात खळबळ

या आवाहनाला नाशिकमधील व्यापाऱ्यांनी प्रतिसाद देत अवघ्या पंधरा दिवसात शहरात तब्बल २ हजार कॅमेरे बसवण्यात आले आहे. नाशिक शहरातील गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या संकल्पनेतून उभ्या राहिलेल्या या सामाजिक उपक्रमाच नाशिकच्या पालकमंत्र्यांनीही कौतुक केले आहे.

तसेच या योजनेअंतर्गत शिंदे फडणवीस सरकारच्यावतीने देखील शहराच्या मुख्य भागात कॅमेरे बसवूले जातील आणि त्यातून शहर लवकरच CCTV च्या कक्षेत येईल अशी माहिती दिली आहे. दरम्यान, पोलिसांनी राबवलेल्या या उपक्रमामुळे ज्या भागात कॅमेरे असतील, अशा भागात गुन्हेगार गुन्हा करताना विचार करतो. त्यामुळे निश्चितच पोलिसांनी शहरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे गुन्हेगारीला आळा बसेल असा आशावाद नाशिककरांनी व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.