Breaking News

नाशिककरांसाठी मोठी बातमी! कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रस्ते टापटीप होणार, गिरीश महाजन यांची ग्वाही; ३७०० कोटींचा बजेट

Girish Mahajan on Nashik Kumbh Mela : 'नाशिक रिंग रोड देखील लवकरात लवकर करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. दीड दोन वर्षात सर्व काम पूर्ण करू', असं गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.
Girish Mahajan on Nashik Kumbh Mela
Girish Mahajan on Nashik Kumbh Mela Saam Tv News
Published On: 

नाशिक : 'यंदा कुंभमेळ्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नॅशनल हायवे रस्त्यांची कामे करण्यात येणार आहेत. घोटी-त्रंबकेश्वर-जवाहर हा रस्ता मुंबईपर्यंत येणार. ट्रॅफीक हे घोटीच्या माध्यमातून त्र्यंबकेश्वर पर्यंत पोहोचेल. यासाठी चारपदरी रस्ता ३७०० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. तसेच नाशिक ते सिन्नरचा देखील विस्तार केला जाणार आहे. नाशिककडे येणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाची सोय होणार असल्यानं त्याचाही विस्तार केला जाणार आहे', अशी माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.

'नाशिक रिंग रोड देखील लवकरात लवकर करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. दीड दोन वर्षात सर्व काम पूर्ण करू. जळगाव ते संभाजीनगर जोडण्यासाठी देखील पर्याय शोधला आहे, जेणेकरून मुंबईला पोहोचण्यासाठी मार्ग उपलब्ध होणार आहे', असं देखील महाजन यांनी म्हटलं आहे.

Girish Mahajan on Nashik Kumbh Mela
Mumbai Fire : घाटकोपरमध्ये अग्नितांडव! ऑर्किड टॉवरमध्ये भीषण आग, परिसरात धुरांचे लोट

दरम्यान, नाशिक आणि रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री कोण होणार? हा विषय आता थंडावला आहे. सुरुवातील पालकमंत्रिपद मिळविण्यासाठी तिन्ही घटक पक्षांमध्ये पदाला कमालीचं महत्त्व प्राप्त झालं होतं. भाजपचे मंत्री गिरीश महाजन, शिवसेनेचे मंत्री दादा भुसे आणि राष्ट्रवादीचे मंत्री माणिकराव कोकाटे या तिघांनीही पालकमंत्रिमंदासाठी फिल्डिंग लावली होती. पण जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी भुसे आणि कोकाटे यांच्या नाकावर टिच्चून सिंहस्थ कुंभमेळा मंत्री म्हणून सर्व सूत्रे हाती घेतल्यानं नाशिकच्या पालिकमंत्रीपदाचे महत्त्वही आता कमी झाल्यासारखंच वाटत आहे.

नाशिक जिल्ह्यात आजच्या घडीला चार मंत्री आहेत. मात्र, पालकमंत्री नाही. अशात काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक दौऱ्यात सिंहस्थ कुंभमेळा तयारीचा आढावा घेतला. यावेळी नाशिक पालकमंत्री पदाच्या घोषणेचे काय याची विचारणा झाली.

Girish Mahajan on Nashik Kumbh Mela
NCP: अजित पवारांचा शरद पवारांना झटका; उत्तर महाराष्ट्रातील बड्या नेत्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी हाती घड्याळ बांधलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com