
नाशिकच्या इंदिरानगर परिसरातील संतापजनक घटना.
विवाहित महिलेला मुंबईत नेऊन बाथरुम फोटो काढले.
आरोपी शकिल तांबोळीने ब्लॅकमेल करून अत्याचार केला.
नाशिकमधील इंदिरानगरमध्ये संतापजनक घटना घडलीय. एका तरुणाने एका विवाहितेला ब्लॅकमेल करत तिच्यावर अत्याचार केल्याची घटना घडलीय. महिलेला फिरण्याच्या बहाण्याने मुंबईला आणले नंतर तिचे बाथरुमधील फोटो काढून तिला ब्लॅकमेल करत तिच्यावर अत्याचार केला.
ओळखीचा गैरफायदा घेऊन विवाहितेचा फोटो आणि व्हिडिओ काढून तिला ब्लॅकमेल करत तिच्यावर वारंवार अत्याचार केला. याप्रकरणी पीडित तरुणीने इंदिरानगर पोलिस ठाण्यात संशयित शकिल तांबोळी याच्याविरोधात गुन्हा नोंदवलाय. दोघेही इंदिरानगरमधील राहणारे आहेत. सप्टेंबर २०२३ मध्ये पीडित तरुणीची ओळख शकिल तांबोळीशी झाली.
त्यांच्यात मैत्रीचे संबंध वाढले. दोघांमध्ये अधूनमधून व्हॉट्सअॅप आणि फोनवर संवाद होऊ लागला. शकिल तिच्या घरी येत-जायचा. एकेदिवशी त्याने तिला मुंबईला फिरायला जाण्याचा प्रस्ताव दिला. मागील वर्षाच्या ऑक्टोबर महिन्यात ते मुंबईला गेले.
तेथे एका हॉटेलमध्ये थांबल्यानंतर शकिलने बाथरूममध्ये गुप्तपणे महिलेचे फोटो आणि व्हिडीओ काढले. त्यानंतर नाशिकला परतल्यानंतर शकिलने हे फोटो आणि व्हिडीओ दाखवत महिलेला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. त्यानंतर तिला एका बिल्डरसोबत संबंध ठेवण्यास सांगितले. जर संबंध ठेवले नाहीतर अन्यथा तुझे फोटो व्हायरल करीन," अशी धमकी त्याने दिली. ब्लॅकमेलिंग सुरू झाल्यानंतर त्याने महिलेच्या घरातच तिच्यावर अत्याचार केला. नंतर माझ्या मित्रासोबत ठेव म्हणून धमकी देऊ लागला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.