Nashik Crime: कंटेनरमधून 400 कोटींची लूट; नाशिकमध्ये घडला हायहोल्टेज ड्रामा

400 Crore Container Robbery: आता राज्याला हादरवणारा प्रकार घडलाय. कंटेनरमधून तब्बल 400 कोटींची लूट केल्याचं समोर आलंय. मात्र हा प्रकार कुठं घडला आणि कसा उघड झाला ? पाहूयात.
400 Crore Container Robbery
Police investigation underway after a sensational ₹400 crore container loot case surfaced in Nashik.saam tv
Published On
Summary
  • नाशिकमध्ये 400 कोटींच्या कंटेनर लुटीचा खळबळजनक प्रकार

  • अपहरणाच्या तक्रारीमुळे संपूर्ण गुन्ह्याचा भांडाफोड

  • संदीप पाटील यांच्या जबाबातून धक्कादायक माहिती

हनी ट्रॅपच्या चर्चेनंतर आता नाशिक चर्चेत आलंय ते एका मोठ्या आर्थिक गुन्ह्यामुळे. कारण कंटेनरमधून तब्बल 400 कोटींची लूट झाल्याचा प्रकार उघड झाला. आणि राज्यात एकच खळबळ उडाली. मात्र या प्रकरणाचा भांडाफोड झाला तो संदीप पाटील नावाच्या तरुणाच्या अपहरण प्रकरणातील तक्रारीमुळे. बंदुकीच्या धाकानं अपहरण कसं केलं. याची आपबिती सांगितलीय संदीप पाटील यांनी.

400 Crore Container Robbery
Crime News : हत्या करून रचला हृदयविकाराचा बनाव, चितेला अग्नी देणार तोच पोलिसांनी ठोकल्या बेड्या, अंत्यसंस्कारापूर्वीच नवऱ्याची पोलखोल

संदीप पाटील यांच्या तक्रारीनंतर नाशिकच्या पोलिसांनी चक्रं फिरवली.. हे फक्त अपहरणाचं गूढ नाही तर 400 कोटी रुपयांच्या जुन्या 2 हजार रुपयांच्या नोटांचं कनेक्शन असल्याचं समोर आलं. या प्रकरणी पोलिसांनी जयेश कदम, विशाल नायडू, सुनील धुमाळ, विराट गांधी आणि जनार्धन धायगुडे यांच्यावर गुन्हा दाखल केलाय.मात्र पोलीस तपासात चक्रावून टाकणारी माहिती समोर आलीय.

400 Crore Container Robbery
घरात टाकली धाड; 61 किलो चांदी अन् नोटांचा डोंगर पाहून पोलीस आयुक्तांचे डोळे झाले पांढरे

2 हजारांच्या जुन्या नोटा घेऊन कंटेनर गोव्यातून कर्नाटकच्या दिशेनं जात होता.

या कंटेनरमध्ये 400 कोटी रुपयांची कॅश होती

कर्नाटकच्या चोरली घाटात कंटेनर लुटल्याचा बनाव करण्यात आला

या प्रकरणात बड्या धेंडांचा हात असल्याचं उघड

हा नोटांचा कंटेनर ठाण्यातील एका बिल्डरचा असल्याचा संशय

या प्रकरणाच्या सखोल तपासात धक्कादायक माहिती समोर आल्यानं पोलिसांनी या प्रकरणी एसआयटीची स्थापना केलीय. तर कर्नाटक पोलिसही या प्रकरणाचा शोध घेताहेत. आतापर्यंत 5 आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.. तर 2 प्रमुख आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. त्यामुळे या प्रकरणी आणखी कोणते बडे मासे गळाला लागणार. याचा शोध घेऊन घोटाळेबाजांच्या मुसक्या आवळायला हव्यात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com