Nagar Manmad Road Accident:
accidentSaam tv

Nashik Accident: मित्राला सोडायला गेले, भयंकर घडलं, अज्ञात वाहनाची धडक; २ जण जागीच ठार, कारचा अक्षरशः चुराडा

Nagar Manmad Road Accident: आंबेवाडी शिवारात हुंडाई कारला पाठीमागून अज्ञात वाहनाने धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की कार रस्त्याच्या तीस ते चाळीस फूट बाजूला हवेत उडून फेकली गेली.
Published on

अजय सोनवणे, नाशिक|ता. १३ सप्टेंबर

Nagar Manmad Road Accident: नाशिकच्या नगर मनमाड महामार्गावर आंबेवाडी शिवारात भीषण अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. हुंडाई कारच्या झालेल्या या विचित्र अपघातामध्ये दोन जण ठार झाले असून १ जण जखमी झाला आहे. अपघातामधील जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हा अपघात इतका भयंकर होता की दोन्ही मृतदेह गाडीचा पत्रा कापून बाहेर काढावे लागले.

Nagar Manmad Road Accident:
Maharashtra Weather News: धुवांधार बॅटिंगनंतर आता विश्रांती! राज्यात पावसाचा जोर ओसरणार; कसं असेल हवामान? वाचा सविस्तर...

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नगर मनमाड महामार्गावर पहाटेच्या सुमारास आंबेवाडी शिवारात हुंडाई कारचा विचित्र अपघात झाला. मित्राला मनमाड रेल्वे स्थानक येथे सोडवण्यासाठी जात असताना आंबेवाडी शिवारात हुंडाई कारला पाठीमागून अज्ञात वाहनाने धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की कार रस्त्याच्या तीस ते चाळीस फूट बाजूला हवेत उडून फेकली गेली, त्यामुळे कारचा अक्षरशः चक्काचुर झाला. या अपघातात कारच्या पाठीमागे बसलेले दोघेजण जागीच ठार झाले आहे व चालक गंभीर जखमी झाला आहे.

आकाश रमेश पवार व निलेश दगु शेवाळे असे ठार झालेल्या व्यक्तींची नाव आहेत तर शुभम गंगाधर पानमळे असे जखमी चालकाचे नाव आहे. अपघातातील मृत आणि जखमी तरुण येवला तालुक्यातील सावरगावचे राहणारे आहेत. अपघातात कारचा एवढा चक्काचूर झाला होता की दोन्ही मृतदेह पत्रा कापून बाहेर काढावे लागले.

Nagar Manmad Road Accident:
Raigad Crime News: तीन तरुणांमध्ये वाद अन् एकाची निर्घृण हत्या, भयंकर घटनेने रायगड हादरलं; हल्लेखोर फरार

दरम्यान, घटनेची माहिती समजताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. तसेच खाजगी रुग्णवाहिकेद्वारे दोन्ही मृतदेह उपजिल्हा रुग्णालय येवला येथे आणण्यात आले असून जखमी चालकावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताचा तपास पोलीस करत आहे.

खासदार शिवाजी काळगेंनी केली अपघातग्रस्ताला मदत...

लातूरवरून उदगीरकडे जात असताना महामार्गावर एका हरणाला वाचवताना रिक्षाचालकाचा मोठा अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात रिक्षा चालकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. दरम्यान जखमी व्यक्तीला लातूरचे खासदार डॉ. शिवाजी काळगे यांनी तात्काळ गाडी थांबवून प्राथमिक उपचार देत मदत केली आणि पुढील उपचारासाठी जखमी व्यक्तीला लातूरच्या रुग्णालयात पाठवण्यात आले.

Nagar Manmad Road Accident:
Maharashtra Politics: विधानसभेसाठी ठाकरेंची नवी रणनीती? देणार मुस्लिम उमेदवार? जाणून घ्या नेमका काय आहे प्लॅन

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com