Ashok Kharat : अमावस्येच्या रात्री जोडप्याला बोलवलं अन्...; नाशिकमधील आणखी एका अशोक खरातचा पदार्फाश

Nashik Ashok Kharat News : आंतरजातीय विवाह निर्विघ्न पार पडावा आणि करणी दूर करावी असे आमिष दाखवत एका दाम्पत्याकडून ५१ हजार रुपये उकळणाऱ्या भोंदू अशोक खरातला शिर्डी पोलिसांनी अटक केली. पुढील तपास सुरू आहे.
FAKE GODMAN ASHOK KHARAT ARRESTED IN SHIRDI FOR CHEATING INTER-CASTE COUPLE OF RS 51000
FAKE GODMAN ASHOK KHARAT ARRESTED IN SHIRDI FOR CHEATING INTER-CASTE COUPLE OF RS 51000Saam Tv
Published On
Summary
  • शिर्डी पोलिसांनी आणखी एका भोंदू अशोक खरातला अटक केली

  • अडचणी दूर करण्याच्या नावाखाली ५१ हजार रुपये उकळले

  • अमावास्येच्या पूजेदरम्यान पोलिसांनी सापळा रचून आरोपीला रंगेहात पकडले

  • गुन्हा दाखल असून पुढील तपास सुरू आहे

सचिन बनसोडे, नाशिक

Nashik Ashok Kharat Case Update नाशिकमधील ‘कॅप्टन’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या भोंदू अशोक खरात प्रकरणाची चर्चा राज्यभर सुरू असतानाच, शिर्डी पोलिसांनी आणखी एका अशोक खरात नावाच्या भोंदूला अटक करून मोठी कारवाई केली आहे. आंतरजातीय प्रेमविवाह निर्विघ्न पार पडावा आणि विवाहानंतर जोडप्यावर नातेवाईकांनी केलेली करणी दूर करावी, असे आमिष दाखवत या भोंदूने एका जोडप्याकडून तब्बल ५१ हजार रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सांगली जिल्ह्यातील अभिजित निकम याचे एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आंतरजातीय लग्न असल्याने काही अडचणी निर्माण होऊ शकतात, अशी भीती संबंधित तरुणीच्या मनात निर्माण करण्यात आली. याचाच फायदा घेत कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी येथील अशोक खरात याने स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचा दावा केला.

FAKE GODMAN ASHOK KHARAT ARRESTED IN SHIRDI FOR CHEATING INTER-CASTE COUPLE OF RS 51000
Gold Rate Today : सराफा बाजार उघडताच सोने चांदीच्या दरात मोठा बदल, जाणून घ्या आजचे ताजे दर

विवाहात अडथळे येणार असून नवऱ्यावर संकट आहे, तसेच नातेवाईकांकडून करणी करण्यात आल्याचे सांगत त्याने दाम्पत्याला घाबरवले. या सर्व संकटांपासून मुक्ती मिळवून देण्यासाठी विविध पूजा, विधी आणि धार्मिक अनुष्ठान करण्याचा सल्ला त्याने दिला. गेल्या वर्षभरात पूजा-अर्चा आणि विशेष विधींच्या नावाखाली त्याने दाम्पत्याकडून वेळोवेळी ५१ हजार रुपये घेतल्याचे तपासात समोर आले आहे. दरम्यान, अमावास्येच्या दिवशी विशेष पूजाविधी करण्यासाठी अशोक खरात याने संबंधित दाम्पत्याला बोलावले होते. याबाबतची माहिती शिर्डी पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने सापळा रचला. पोलिसांनी घटनास्थळी धाड टाकून अशोक खरात याला रंगेहात ताब्यात घेतले. तसेच त्याची साथीदार माया विठ्ठल कुसळकर हिलाही राहाता परिसरातून अटक करण्यात आली.

FAKE GODMAN ASHOK KHARAT ARRESTED IN SHIRDI FOR CHEATING INTER-CASTE COUPLE OF RS 51000
Monsoon Update : राज्यात मान्सूनची प्रतीक्षा कायम, 'या' जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा अलर्ट; वाचा हवामान अंदाज

अभिजित निकम यांच्या फिर्यादीवरून शिर्डी पोलिस ठाण्यात अशोक खरात आणि त्याच्या साथीदाराविरोधात महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ट आणि अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या भोंदूने अशाच प्रकारे आणखी किती नागरिकांची फसवणूक केली आहे, याचा शोध पोलिस घेत आहेत. आर्थिक लाभासाठी अंधश्रद्धेचा आधार घेत लोकांना गंडा घालणाऱ्या या प्रकरणाचा शिर्डी पोलीस सखोल तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com