

तबरेज शेख, प्रतिनिधी...
Nashik Accident News: नाशिकमधू एक दुर्देवी अपघाताची घटना समोर आली आहे. नाशिकच्या शासकीय रुग्णालयातून आईला आणायला निघालेल्या मुलाचा कंटेनरच्या धडकेत मृत्यू झाला. आकाश कैलास कोतकर असे मृत तरुणाचे नाव असून या भयंकर घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Nashik Accident)
याबाबत अधिक माहिती अशी की, गेल्या चार दिवसांपासून आकाशची आई शासकीय जिल्हा रुग्णालयात (Nashik) उपचार घेत आहे. आज त्याच्या आईला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार होता. आईला घरी घेऊन जाण्यासाठी आकाश पिंपळगाव येथून नाशिकला त्याच्या मित्रांसोबत दुचाकीवर निघाला होता.
द्वारका येथील उड्डाणपुलावर आकाश आला. याठिकाणी बंद कंटेनर उभा होता. त्याची दुचाकी उभ्या असलेल्या कंटेनरवर मागच्या बाजूस जाऊन आदळली. यामध्ये ते दोघेही गंभीर जखमी झाले होते. (Latest Marathi News)
अपघातानंतर दोघांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी आकाशला मृत घोषित केले असून एक गंभीर जखमी आहे. त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या मन सुन्न करणाऱ्या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Accident News)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.