Nashik News : भयंकर! खेळता खेळता दोन वर्षांचा चिमुकला इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली पडला; धक्कादायक VIDEO

Nashik boy fell Down News : खेळता-खेळता दोन वर्षाचा चिमुकला इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली पडल्याची धक्कादायक घटना नाशिकच्या सिडको परिसरातील काळे मळा परिसरात ही घटना घडली.
भयंकर! खेळता खेळता दोन वर्षांचा चिमुकला इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली पडला; धक्कादायक VIDEO
Nashik boy fell Down NewsSaam TV

खेळता-खेळता दोन वर्षाचा चिमुकला इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली पडल्याची धक्कादायक घटना नाशिकच्या सिडको परिसरातील काळे मळा परिसरात ही घटना घडली. या घटनेत चिमुकल्याला गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काळजाचा ठोका चुकवणारी ही घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

भयंकर! खेळता खेळता दोन वर्षांचा चिमुकला इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली पडला; धक्कादायक VIDEO
Pune Crime News : पुण्यात महिला वाहतूक पोलिसाला भररस्त्यात पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न, धक्कादायक घटनेनं खळबळ

करिम शेख (वय २ वर्ष) असं जखमी झालेल्या चिमुकल्याचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, करिम हा सकाळी ९ वाजेच्या सुमारास इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील गॅलरीत (Nashik News) खेळत होता. त्याचवेळी करिमची आई घरकामात होती. दरम्यान, गॅलरीत खेळत असलेला करिम खेळता खेळता अचानक रिलॉगवर पकडून उभा राहिला.

त्यामुळे त्याचा तोल गेला आणि तो दुसऱ्या मजल्यावरून थेट जमिनीवर कोसळला (Shocking News). काहीतरी पडण्याचा आवाज आल्याने शेजारील नागरिक बाहेर आले. त्यावेळी त्यांना करिम हा गंभीर जखमी अवस्थेत जमिनीवर पडलेला दिसून आला. बाळ इमारतीवरून खाली पडल्याची ही घटना परिसरात अक्षरश: वाऱ्यासारखी पसरली.

नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मोठी गर्दी केली. जखमी अवस्थेत असलेल्या करिमला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. नशीब बलवत्तर म्हणून चिमुकला करिम याचे प्राण वाचले. मात्र, अद्यापही त्याची प्रकृती चिंतानजक असल्याचं बोललं जातं आहे.

अंगाचा थरकाप उडवणाऱ्या या घटनेचा थरार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, की करिम दुसऱ्या मजल्यावरून खाली पडताना दिसून येत आहे. तो खाली पडताच परिसरातील नागरिक आरडाओड करून त्याच्या दिशेने धाव घेत आहेत. याप्रकरणी पोलिसांकडून गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.

भयंकर! खेळता खेळता दोन वर्षांचा चिमुकला इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली पडला; धक्कादायक VIDEO
Nagpur News : हृदयद्रावक! पत्नीला कर्करोग, डोक्यावर कर्जाचा डोंगर; पती-पत्नीनं आयुष्य संपवलं, मुलीलाही पाजलं विष

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com