Nandurbar Accident: भीषण अपघात! ब्रेकफेल झालेल्या ट्रकची दुचाकी, ट्रॅक्टरला धडक; तिघांचा जागीच मृत्यू

Dhule Surat Highway Accident: दुचाकीवरील तिघेही नवापूर तालुक्यातील वाटवी गावचे असून ते साक्री तालुक्यात शेतीच्या कामानिमित्त गेले होते.
Nandurbar Accident:
Nandurbar Accident:Saamtv
Published On

सागर निकवाडे, प्रतिनिधी

Nandurbar Accident:

नंदुरबारमधून एक दुर्दैवी अपघाताची घटना समोर आली आहे. नंदूरबार जिल्ह्यातील धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर कोंडाईबारी घाटात ट्रक, ट्रॅक्टर व दुचाकी यांच्यात तिहेरी अपघात झाला. या अपघातात दोन महिलांसह एक पुरूषाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, नंदूरबार जिल्ह्यातील धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर (Dhule Surat Mahamarg) कोंडाईबारी घाटात ट्रक, मोटरसायकल व ट्रॅक्टरचा तिहेरी अपघात झाला. या अपघातात मोटरसायकलवरील 1 पुरुष व 2 महिलांचा जागीच मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.

प्राथमिक माहितीनुसार, दुचाकीवरील तिघेही नवापूर तालुक्यातील वाटवी गावचे असून ते साक्री तालुक्यात शेतीच्या कामानिमित्त गेले होते. अपघातातील ट्रकचा ब्रेकफेल झाल्याने तो अनियंत्रित झाला. या ट्रकने आधी दुचाकीला आणि नंतर ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली. ट्रकची धडक इतकी भीषण होती की, मोटरसायकल १०० मीटर फरफटत केली. यामध्ये गाडीवरील तिघांचाही जागीच मृत्यू झाला.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Nandurbar Accident:
MLA Disqualification Case: मोठी बातमी! 34 याचिकांची 6 याचिकेत विभागणी, आमदार अपात्रतेप्रकरणी आजच्या सुनावणीत काय घडलं?

या ट्रकच्या धडकेत ट्रॅक्टरवरील चालकही गंभीर जखमी झाला असून त्याच्या डोक्याला मार लागला आहे. सध्या त्याच्यावर विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.

चार दिवसांत पाच जणांचा मृत्यू....

एकीकडे समृद्धी महामार्गावर (Samruddhi Highway Accident) अपघातांची मालिका सुरू असतानाच धुळे नवापूर रस्त्यावर देखील वारंवार अपघाताच्या घटना घडत आहेत. चार दिवसांपूर्वी धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर  विसरवाडी गावानजीक ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला होता. या अपघातही दोघांना जीव गमवावा लागला. (Latest Marathi News)

Nandurbar Accident:
Manoj Jarange News: 'मला बोलू द्या, अन्यथा...'; मनोज जरांगेंच्या भाषणावेळी तरुणाचा स्टेजवर गोंधळ

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com